जनावरे पाळणाऱ्या आणि मासळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ

0
609

 गोवा खबर: शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या किसान क्रेडिट कार्ड योजनेखाली आता जनावरे पाळणाऱ्या आणि मासळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. गोव्यातील  जनावरे पाळणाऱ्या आणि मासळी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

 प्रधानमंत्री किसान योजनेचा पहिला वार्षिक दिवस म्हणजे २४ फेब्रुवारी पर्यंत एक कोटी किसान क्रेडिट कार्ड देण्याचे उद्दीष्ठ बँकानी ठेवले आहे. जिल्हा प्रशासन, नाबार्ड, बँक आणि राज्य सरकारच्या संबंधित खात्याच्या सहकार्याने ही मोहिम राबविता येते. सर्व पात्र प्रधानमंत्री किसान लाभधारकांचा समावेश किसान क्रेडिट कार्ड योजनेखाली करण्याचा सल्ला बँकांना दिला आहे. या योजनेसंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी सरकारी यंत्रणाच्या सहकार्याने बँकांमार्फत जागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येते. किसान क्रेडिट कार्ड योजनेचा फायदा घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेकडे संपर्क साधून अर्ज करावा.

 अर्ज सादर केल्यानंतर दोन सप्ताहाच्या आत पात्र शेतकऱ्यांना संबंधित बँकेकडून किसान कार्ड जारी करण्यात येईल. त्याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड योजनेखाली ३ लाखापर्यंत कर्ज घेतलेले शेतकरी आरबीआय आणि नाबार्डमार्फत चालीस लावण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या इंटरेस्ट सबव्हेशन योजनेलाही पात्र आहेत. त्याचप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या ३ लाखापर्यंतच्या कर्जासाठी सर्व प्रकारचे प्रक्रिया शुल्क माफ असेल.