जनतेने कमी प्रवास करावा असा रस्ते मंत्रालयाचा सल्ला

0
734

 

प्रवास टाळण्यासाठी आगाऊ प्रवास भाडे परत करण्याचा मार्ग चोखाळण्याची विनंती

 

 गोवा खबर:नॉव्हेल कोरोना विषाणू संसर्गाला आळा घालण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना करण्याची विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाला केली आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी संपर्काची वारंवारता टाळण्याचे महत्त्व केंद्रीय रस्ते मंत्रालयाने सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिव आणि इतर सचिवांना पाठवलेल्या पत्रात अधोरेखित केले आहे.

नागरिकांसाठीच्या वाहतूक व्यवस्थेच्या फेऱ्या कमी करणे, ते शक्य नसल्यास प्रवाशांनी आगाऊ भरलेले प्रवासी भाडे परत करणे यासारख्या उपाययोजना करण्याचा सल्ला मंत्रालयाने दिला आहे. तसेच राज्य तसेच केंद्र सरकारांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वाहतूक व्यवस्थेबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती सामान्य प्रवाशांना लघु संदेशांद्वारे कळविण्याची व्यवस्था करावी, असेही मंत्रालयाने या पत्रात म्हटले आहे.