जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेला विधानसभेत पाठवा:कामत; शिरवई-केपेत शिवसेनेच्या शाखेचे उद्धाटन

0
1027
गोवाखबर:राज्यातील सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सदैव प्रलंबित आहेत.विद्यमान सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून लोकांचे प्रश्न सोडवण्याची संधी देण्यासाठी शिवसेनेला विधानसभेत पाठवा, असे आवाहन राज्य प्रमुख जितेश कामत यांनी केले.
शिरवई येथे काल शिवसेनेच्या शाखेचे उद्धाटन केल्यानंतर ते बोलत होते. आले.केपे शहर प्रमुख उल्हास ठाकुर,तालुका प्रमुख संजय देसाई यांच्या पुढाकारातुन ही शाखा सुरु करण्यात आली आहे.
शाखा स्थापन करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा प्रमुख अलेक्सी फर्नांडिस आणि उपराज्यप्रमुख राखी प्रभुदेसाई नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.आजच्या उद्धाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्य प्रमुख जितेश कामत उपस्थित होते.यावेळी सत्यवान राणे यांची शाखा प्रमुखपदी तर जानू कोकरे यांची उपशाखाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.शिरवई मधील लोक मोठ्या संख्येने शिवसेनेत सहभागी झाले.
सरकार सगळ्या पातळ्यावर अपयशी ठरले असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेला आवाज उठवावा लागत आहे.शिवसेना सर्व सामान्य लोकांच्या हितासाठी नेहमीच झटत राहिल असे प्रतिपादन दक्षिण गोवा प्रमुख फर्नांडिस यांनी केले.
उपराज्यप्रमुख नाईक म्हणाल्या,राज्यात शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद वाढत आहे.शिवसेनेचे कार्य घराघरात पोचवून जनतेचे प्रश्न सोडवणे हे शिवसैनिकाके आद्य कर्तव्य आहे.शिवसेनेने लोकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे.
राज्यप्रमुख कामत यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार तोफ डागली. सरकारला सर्वसामान्य लोकांचे काही पडून गेलेले नाही.लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडवण्यात सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे.लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना विधानसभेत असणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला शाखा विस्तार प्रमुख राजू विर्डिकर, नियोजन विभाग प्रमुख फेलिक्स डायस,म्हापसा विभाग प्रमुख सूरज वेर्णेकर आदी यावेळी उपस्थित होते.