जनता हीच हायकमांड-चेल्लाकुमार

0
946

गोवाखबर:लोकशाहीत जनता हीच हायकमांड आहे.जनतेला आपली गाऱ्हाणी घेऊन नेत्यांकडे यावे लागू नये यासाठी भाजप आघाडी सरकार विरोधात जनतेत खदखदत असलेल्या असंतोषाला वाचा फोडणे आणि जनतेशी असलेले संबंध अधिक दृढ़ करण्यासाठी काँग्रेसने जन गण मन नमन तुका गोंयकारा ही मोहीम हाती घेतली असून आज त्याचा प्रारंभ होत आहे.यातून काँग्रेस पक्षाचा जनाधार आणखी वाढेल अशी अपेक्षा गोवा काँग्रेसचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी सांगितले.
काँग्रेसतर्फे आयोजित जन गण मन नमन तुका गोंयकारा या मोहीमेचा शुभारंभ आज पणजी बस स्थानका जवळील मारुती मंदिराकडून करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर,विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर,सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस,माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो,प्रवक्ते सिद्धनाथ बुयाव,जनार्दन भंडारी,सुनीता वरेकर आणि पणजी मधील कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना चोडणकर आणि कवळेकर यांनी सरकार सगळ्या पातळ्यांवर अपयशी ठरत असल्याची टिका केली. त्यानंतर सर्व कार्यकर्ते बस मधून म्हापशाला रवाना झाले.