जगातील सर्वांत मोठे सिरॅमिक्स प्रदर्शन नोव्हेंबरमध्ये गांधीनगर (गुजरात) येथे भरणार

0
901

 

गांधीनगर (गुजरात) येथे भरणार भारतातील सिरॅमिक उद्योगक्षेत्राची वार्षिक उलाढाला २०२० पर्यंत दुप्पट होऊन रु. ५०,००० कोटीपर्यंत वाढण्याची अपेक्षा
 गोव्यातील वाढता हॉटेल उद्योग आणि कमी किमतीतील घरनिर्मिती योजनेसाठी दर्जेदार सिरॅमिक्सची गरज
 जागतिक पातळीवर भारतीय सिरॅमिक्स उद्योग दुसऱ्या स्थानी, तर जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा १२.९%
गोवा: व्हायब्रंट सिरॅमिक्स एक्स्पो अँड समिट २०१७च्या पत्रकार परिषदेचे गोव्यात ३०
ऑक्टोबर २०१७ रोजी आयोजन करण्यात आले. गोव्यात भेट देण्यामागचा प्रमुख उद्देश म्हमजे सिरॅमिक
उद्योगाबाबत जागृती वाढवणे आणि सिरॅमिक उद्योग क्षेत्रात चीननंतर भारताचे स्थान लागते हे सिद्ध करणे. या
परिषदेदरम्यान आणखी एक निरीक्षण म्हणजे भारतीय सिरॅमिक उद्योगाने मोरबी-गुजरातमधून सिरॅमिकची
आयात केली तर या उद्योगक्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या चीनसारख्या देशालाही भारत मागे टाकू शकतो असा सूर
व्यक्त झाला.
गांधिनगर- गुजरात शहरातील टाऊन हॉलजवळील प्रदर्शन केंद्रामध्ये १६ ते १९ नोव्हेंबर २०१७ रोजी व्हायब्रंट
सिरॅमिक्स एक्स्पो अँड समिट (व्हीसीईएस)-२०१७चे आयोजन करण्यात आले आहे. ५०,००० चौरस मीटर परिसरात
हे प्रदर्शन भरवण्यात येणार असून यामध्ये विविध आर्थिक स्तरातील २५०हून अधिक कंपन्या, ४००हून अधिक ब्रँड
एकाच छताखाली सादर होणार आहेत.
व्हायब्रंट सिरॅमिक्स एक्स्पो अँड समिट-२०१७चे अध्यक्ष श्री. निलेश जेतपारिया म्हणाले, “जागतिक टाइल्स क्षेत्रात
भारत दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. २००६ ते २०१३ या कालावधीत जागतिक फरशी उत्पादन वार्षिक ६.३%
दराने वाढले, तर भारतातील या उद्योगाच्या वाढीचा दर दुप्पट म्हणजे १२.०% टक्के राहिला. भारतातील एकूण
फरशी मागणीमध्ये सिरॅमिक टाइल्सचा वाटा ६०% असून २०१४ ते २०१९ या कालावधी ही वाढ ८.७% सीएजीआर
दराने होण्याचा अंदाज आहे.”
ते म्हणाले, “भारत सरकारच्या मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्वच्छ भारत अभियान अशा विविध योजनांशी
सुसंगत धोरण सिरॅमिक उद्योग क्षेत्राने अंगिकारले आहे. सातत्याने नावीन्यतेचा अवलंब करणे, देशाच्या आर्थिक
विकासास हातभार लावणे आणि राज्यांमध्ये रोजगार संधी वाढवण्यास प्रोत्साहन देणे याबाबत
आमचा सतत प्रयत्न चाललेला आहे. सध्या हे उद्योग क्षेत्र ४ अब्ज अमेरिकी डॉलर इतके उत्पन्न देत असून
कुशल तसेच अकुशल अशा तब्बल १० लाखांहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करत आहे.”

व्हायब्रंट सिरॅमिक्स एक्स्पो अँड समिट-२०१७चे अध्यक्ष श्री. संदीप पटेल म्हणाले, “तंत्रज्ञान हस्तांतरण, गुंतवणूक,
संयुक्त उपक्रम, बी२बी आणि बी२जी संवाद संधी ही या परिषदेची वैशिष्ट्ये ठरणार असून प्रदर्शनात आधुनिक
तंत्रज्ञान, सिरॅमिक टाइल्स, सॅनिटरी-वेअर व बाथ फिटिंग्स उत्पादने व सेवा सादर केल्या जाणार आहेत. सिरॅमिक
उद्योग क्षेत्रातील प्रमुख घटकांना एकत्र आणून या क्षेत्राच्या विकासासाठी समन्वय वाढवणे या उद्देशांसाठी

व्हायब्रंट सिरॅमिक्स हा उपक्रम राबवला जात आहे. एकाच व्यासपीठावर या उद्योग क्षेत्रातील सर्व प्रकारचे
व्यावसायिक स्रोत एकत्र आणणे आणि त्यांच्यामध्ये संवाद, सहकार्य वाढवणे यासाठी आमचा प्रयत्न आहे.”
गतवर्षी आयोजित पहिल्या व्हायब्रंट सिरॅमिक्स प्रदर्शनास २२हून अधिक देशांतून आलेल्या ६१०हून अधिक विदेशी
प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. यंदा ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत ६५हून अधिक देशांतील २५००हून
अधिक प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदवला. या चार दिवसांच्या उपक्रमात एक लाखांहून अधिक लोक सहभागी
झाले. या उपक्रमात ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय तर १३०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या उत्पादनांसाठी
मागणी नोंदली गेली.
व्हायब्रंट सिरॅमिक्स २०१७साठी ६५ देशांमध्ये रोड शोचे आयोजन करण्यात आले. या रोड शो मध्ये आयोजक
स्वतः सहभागी तर झालेच, शिवाय भारतातील १०० स्मार्ट सिटीमधील प्रतिनिधीही सहभागी झाले.
ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कंबोडिया, चीन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जॉर्डन, केनिया, लॅटिविया,
मदगास्कर, मॉरिशन, मेयोट, मेक्सिको, नेपाळ, ओमान, फिलिपिन्स, पोलंड, कतार, रशिया, सौदी अरब, सेनेगल,
दक्षिण आफ्रिका, स्पेन, श्रीलंका, टांझानिया, युगांडा, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरिका, सर्बिया अशा विविध
देशांतील हे प्रतिनिधी आहेत.