जगातील पहिला कोंकणी भयपट ‘सिंथिया’ ची पहिली झलक प्रेक्षकांना खिळवायला तयार !

0
1218

गोवा खबर: आतापर्यंत प्रेक्षकांना ज्या गोवन सिनेमाची कुतूहल होती त्या ‘सिंथिया’ सिनेमाची पहिली झलक नुकतीच दोना पावला येथील द इंटरनेशनल सेंटर गोवा येथे प्रेक्षकांसाठी प्रसिद्ध करण्यात आली. या प्रसंगी ‘सिंथिया’ च्या पोस्टरचे ही अनावरण झाले. सिनेमातील कलाकार आणि इतर चमू कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘सिंथिया’ हा सिनेमा जगातील पहिला कोंकणी भयपट असणार आहे.

पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांना संबोधित करताना ‘सिंथिया’ चे लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता, एल्विस कान फर्नांडिस म्हणाले, “गोव्यातील सिनेमा मध्ये या पुर्वी, होरर मिस्ट्री या शैलीचा चित्रपट आधी पाहिला गेलेला नाही. आम्ही फक्त या आव्हानात्मक शैलीचा उलगडाकेला नाही, तर प्रेक्षकांसमोर आमच्या मेहनतीचं फळ प्रस्तुत केलं आहे ज्याने लोकांचा कोकणी सिनेमाकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन बदलेल.भारतातील काही अत्यंत गुणी सिनेमा तंत्रज्ञ्यांनी या चित्रपटावर काम केले आहे, तसेच जागतीक पातळींवर वापरल्या जाणाऱ्या तंत्राचाउपयोग आम्ही पोस्ट प्रोडक्षन मध्ये केला आहे. माझी एवढीच आशा आहे की गोव्यातील व जगातिल सर्व गोवेकरांना हा चित्रपट आवडेलआणि आम्हास सर्वांचे प्रेम व समर्थन मिळेल जे आम्हाला कोकणी सिनेमाला एका नविन पातळींवर नेण्यास मदत करेल.”

जोजफ एम लोबो या चित्रपटाचे निर्माते सुद्धा पत्रकार परिषदेत हजर होते. या चित्रपटाविषयी त्यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “एल्विस माझ्याकडे जेव्हा ही संक्लपना घेउन आला, तेव्हाच मला ती फार आवडली पण हे ही ठाऊक होते की हे सोपे नसणार, तरीही मला एल्विसच्या द्रुष्टिकोनावर पुर्ण विश्वास होता. आता चित्रपट पाहिल्यावर मी नक्कीच सांगू शकतो की एल्विसने कोंकणी सिनेमा खरच एका नविन ऊंचवट्यावर नेला आहे.”

गोव्यातील सिनेमा सृष्टीत या अगोदर, होरर मिस्ट्री ही शैली कधीही प्रस्तुत केली गेलेली नाही. मात्र गोवा ग्लोबल प्रोडक्शन्स या आणि गोव्यातील फिल्म प्रोडक्शन  हाऊसने हा विषय हातात घेऊन सिंथिया चित्रपट बनविला आणि आता हा कोंकणी चित्रपट जगभऱ्यातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यास अगदी तयार आहे. सिनेमाचे चित्रीकरण गोव्यातील  वेगवेगळ्या निसर्गरम्य अश्या ठिकाणी झाले आहे.  या चित्रपटाला एल्विस कान्ह  फर्नांडिस यांनी संगीत दिले असून हे संगीत प्रेक्षकांना नक्कीच मंत्रमुग्ध करेल  माया कालसी हि चित्रपटाची मुख्य कलाकार आहे. ‘सिंथिया’ च्या मुख्य भूमिकेत, अभिनेत्री माया कालसी आहेत. तसेच कोंकणी सिनेमातले दिग्गज कलावंत – गौरी कामत, कुणाल मालारकर, फेर्मीनो गोयेस, फैथ बरेटो आणि प्रिन्स जेकब महत्त्वाच्या भुमिका साकारताना दिसतील.