छायापत्रकार संघटनेचा १९ रोजी वर्धापन दिन सोहळा

0
1142
बक्षिस वितरण , छायाचित्रकारांचा सन्मान आणि छायाचित्र प्रदर्शन
गोवा खबर:छाया पत्रकार संघटना गोवातर्फे  १९ ऑगस्टरोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक छायाचित्रण दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या  वर्धापन दिन सोहळ्यात राज्यस्तरीय छायाचित्र स्पधेर्तील विजेत्यांना पारितोषिके आणि गोव्यातील ज्येष्ठ छायाचित्रकारांचा  यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
पाटो येथील कला आणि संस्कृती भवनातील  बहूउद्देशीय  सभागृहात  १९ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून गोवा राज्याचे  मुख्यमंत्री  डॉ प्रमोद सावंत, खास निमंत्रीत कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, कला आणि संस्कृती संचालक गुरुदास पिळर्णकर आणि माहिती आणि प्रसिद्दी खात्याच्या  संचालक मेघना शेटगांवकर यांची उपस्थिती असणार आहे.
कला आणि संस्कृती संचालनालया यांच्या सयुंक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून  ज्येष्ठ छायाचित्रकार  प्रशांत येळेकर, लॉरेन्स फर्नाडीस  आणि  वाळपई सत्तरीतील मकरंद बर्वे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.  खुला गट आणि शालेय पातळीवरील राज्यस्तरीय छायाचित्र स्पधेर्तील विजेत्यांना बक्षिसे प्रधान करण्यात येतील.
राज्यातील विविध वर्तमानपत्रात कार्यरत असलेल्या छायापत्रकारांचे छायाचित्र प्रदर्शन या सोहल्चेया खास आकर्षण असणार आहे. माजी सरंक्षण मंत्री तथा गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व.  मनोहर पर्रीकर यांची छायापत्रकारांनी  टिपलेली काही  निवडक  छायाचित्रे या प्रदर्शन मांडण्यात येतील.  तसेच राज्यस्तरीय स्पधेर्तील विजेते आणि निवडक छायाचित्रांचाही  प्रदर्शनात समावेश असेल.  १९ आणि २० रोजी  कला आणि संस्कृती खात्याच्या आर्ट गॅलरीत हे छायाचित्र प्रदर्शन  नागरीकांसाठी खुले राहील. या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष संदीप देसाई आणि सरचिटणीस  कैलास नाईक यांनी केले आहे.