चौथ्या राष्ट्रीय खाण आणि खनिज परिषदेमुळे खनिज लिलावाला बळकटी मिळेल: नरेंद्र सिंग तोमर

0
1101

गोवा खबर:मध्यप्रदेशात इंदोर येथे येत्या 13 जुलैला  खाण आणि खनिज विभागाची चौथी राष्ट्रीय परिषद होणार आहे. वर्ष 2018-19 मध्ये कोणत्या खाणीचा लिलाव होणार आहे, हे या परिषदेत इच्छुक कंपन्याना दाखवले जाईल.

खनिज लिलावांना प्रोत्साहन देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला या परिषदेमुळे बळकटी मिळेल, तसेच, लिलाव प्रकीया अधिक गतिमान होण्यासाठी हितसंबंधी गटांचा सहभागही वाढवता येईल, अशी अपेक्षा केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी व्यक्त केली.लिलाव प्रकीया अधिक सुसंगत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करत आहे, असे ते म्हणाले. या परिषदेत, राज्य सरकारांनाही त्यांच्या अखत्यारीतील लिलावयोग्य खाणी दाखवता येतील, असेही त्यानी सांगितले. तसेच गुंतवणूकदारांना खानिज पट्टे बघून त्यांच्या गुंतवणुकीचा निर्णय घेता येईल.

या परिषदेत विविध खनिज पट्ट्याचे सादरीकरण केले जाईल,तसेच या खानिजांसाठी आवश्यक त्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रियाही सांगितली जाईल. या लिलावाशी संबधित सर्व यंत्रणांनी लिलावपूर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. परिषदेदरम्यान उद्योगजगत आणि मंत्र्यांच्या बैठकाही होतील. ज्यामध्ये खाण आणि खनिज धोरणाविषयी चर्चा होईल.

या परिषदेसाठी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर “NCMM July, 2018” हे पेज तयार करण्यात आले आहे.