चोरी प्रकरणी महिलेस अटक;60 लाखांचा माल जप्त

0
719
गोवा खबर:दक्षिण गोव्यातील आगाळी येथे झालेल्या  चोरी प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी सिल्व्हिया फर्नांडिस हीच्या मुसक्या आवळल्या  आहेत.  तिच्याकडून भारतीय चलनातील दोन लाख रुपये, लाखो रुपायांचे विदेशी चालन आणि दागिने मिळून साठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 
संशयीत आरोपी सिल्व्हिया फर्नांडिस ही काही वर्षांपूर्वी दासा नाईक यांच्या घरात भाडेकरू म्हणून रहात होती. तीने चोरीचा माल एका घरात लपवून ठेवला होता. फातोर्डा पोलिसांनी सिल्व्हियाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील अन्य एक जोडपे अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
एक एप्रिल रोजी यासंदर्भात पोलिस तक्रार झाली होती. दासा  नाईक हे मडगाव शहरातील नामांकित उद्योजक आहेत. आगाळी येथील सेंट अंथॉनी चॅपेल जवळ त्यांचे तीन माजली घर आहे.  त्यांनी काही वर्षांपूर्वी वरील दोन मजले भाड्याने दिले होते आणी ते आपल्या कुटुंबासमवेत तळ मजल्यावर रहात होते.
फातोर्डा पोलिस स्थानकाचे निरीक्षक सलीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ मार्च रोजी चोरीची ही घटना घडली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली असता नाईक यांच्या तीन मजली घरात दुसऱ्या मजल्यावर एक प्रभुदेसाई नावाचे कुटुंब वास्तव्याला असल्याचे समजून आले.
सहा वर्षापूर्वी सिल्व्हिया ही तिसऱ्या मजल्यावर भाड्याने रहात होती असे तपासात समोर आले. पोलिसांनी तपासाची सूत्रे सिल्व्हिया हिच्या दिशेने वळवली असता सध्या ती शांतीनगर रावण फोंड येथे रहात असल्याचे त्यांना आढळून आले.
पोलिसांनी एक एप्रिल रोजी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीला तिने आपला यात हात नसल्याचे सांगितले.  पण पॉलिसी हिसका दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.
संशयित सिल्व्हिया ही मडगावातील एका घरात आजारी वृद्धाची काळजी घेण्याचे काम करत आहे. सदर वृद्ध व्यक्ती अंथरुणावर खिळलेला असल्याने त्यांच्या असहाय्यतेचा फायदा उठवत सिल्व्हिया हिने चोरीचा माल यांच्या घरात लपवून ठेवला होता. या पैशातून तिने महागडा फोन खरेदी केला होता तसेच काही पैसे तिने मौजमजेसाठी खर्च केले होते. अनेक महिने तिने नाईक यांच्या घरावर पाळत ठेऊन धाडसी चोरीचा प्लॅन आखला.
मागील दारातून आत येऊन तिने कपाटात ठेवलेला सर्व माल चोरला होता अशी माहिती पोलीस निरीक्षक सलीम यांनी दिली आहे