चोडण शिक्षण संस्थेने उभा केला आहे आदर्श : श्रीपाद नाईक 

0
1007

 

 

गोवा खबर:शिक्षण क्षेत्रात बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. चोडण शिक्षण संस्थेने याबाबत आदर्श निर्माण केला आहे. बेटावर वसलेल्या गावात इतकी चांगली गुणवत्ता निर्माण करणे, ही सोपी गोष्ट नाही, असे उद्गार केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी आज चोडण येथे काढले.

नाईक यांच्या खासदार निधीतून तयार झालेल्या चोडण शिक्षण संस्थेच्या रघुवीर व प्रेमावती सालकर उच्च माध्यमिक कला व वाणिज्य विद्यालयाच्या डिजिटल वर्गांचे उद्घाटन नाईक यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. विद्यालयाचे यंदाचे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष आहे.संस्था व शाळा उभी करण्यात ज्यांचे योगदान आहे त्यांचे नाईक यांनी अभिनंदन केले. जनतेने दिलेल्या आशिर्वादाच्या माध्यमातूनच खासदार निधीतून थोडी ताकद संस्थेला देऊ शकलो,अशी भावना नाईक यांनी व्यक्त केली.आजच्या पिढीला पुढे जाण्यासाठी संगणकीय शिक्षण मदत करेल.शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी देखील आपले कर्तव्य पार पाडावे; एका पिढीने दुसऱ्या पिढीला उभे राहण्यासाठी मदत केली पाहिजे, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.

 

 

 

​ ​

 

​ ​

 

​ ​

 

​ ​

 

​ ​

 

​ ​

 

​ ​

 

​ ​

 

 

​ ​

 

​ ​

 

​ ​

 

​ ​