चोडणकर यांचा विजय निश्चित:रेजिनाल्ड

0
943
मनोहर पर्रिकर हे पणजीचे आमदार आणि मुख्यमंत्री म्हणून 23 वर्षे वावरले पण त्यांना पणजीचे मूलभूत प्रश्न सोडवता आले नाहीत.पर्रिकर यांना पुन्हा निवडून देणे म्हणजे अपेक्षाभंग करून घेण्यासारखे असल्याने सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन गोव्याच्या विकासासाठी धडपडणाऱ्या गिरीश चोडणकर यांना यावेळी निवडून आणा आणि पणजीचा विकस साध्य करून घ्या असे आवाहन कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केले.
चोडणकर यांनी पणजी मधील अनेक भागात घरोघर जाऊन प्रचार केला. पर्रिकर यांच्या कारभाराला जनता विटली असून लोकांचा आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे असा दावा चोडणकर यांनी केला आहे.सोशल मीडिया बरोबर प्रचार वाहन रस्त्यांवर उतरवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा चोडणकर यांचा प्रयत्न आहे.
पर्रिकर हे तत्वांच्या गोष्टी सांगत असले तरी त्यांनी ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्यांनाच घेऊन सरकार स्थापन केले आहे.पर्रिकर यांची लबाड़ी लोकांना कळून चुकली असून पर्रिकर यांना लोक यावेळी घरी पाठवतील आणि चोडणकर यांच्यासारख्या साध्या माणसाला निवडून देतील असे रेनिनाल्ड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.