चेतन पेडणेकरांची राष्ट्रवादी मधून शिवसेनेत घरवापसी

0
1169

गोवाखबर:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवसेनेचे माजी विद्यार्थी विभाग प्रमुख चेतन पेडणेकर यांनी आज शिवसेना पक्षात घरवापसी केली. गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, राज्य सरचिटणीस मिलींद गावस आणि राज्य सचिव अमोल प्रभुगावकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांची युवा विभाग संघटकपदी आणि विद्यार्थी विभाग प्रभारीपदी नेमणूक केली.
विकास कुडतरकर यांची विद्यार्थी संघटकपदी नेमणूक करण्यात आली असून राज्य सचिव अमोल प्रभुगावकर यांच्याकडे युवा विभाग प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
 मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पणजी आणि मडगाव येथे मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात होती. पणजी येथे काही मोटरसायकल चालकांनी तर मडगाव येथे सर्व चालकानी हेल्मेट परीधान केले नव्हते त्याचा शिवसेनेने निषेध केला आहे. दामू नाईक, शर्मद रायतूरकर सारख्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना तर हे बिलकुल शोभत नसुन समाजात चुकीचा संदेश पोहोचवण्याचे दुष्कर्म त्यांनी केले असल्याची जोरदार टीका गोवा शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी केली आहे.
 मागील सरकारात आमदारांनी अशाच प्रकारे कायद्याचे उल्लंघन करून मोटरसायकलवरून बिना हेल्मेट विधानसभा संकुलात येऊन चुकीचा पायंडा घातला होता तेव्हा त्यांना दंड आकारून सरकारने लोकांचा रोष क्षमवण्याचा प्रयत्न केला होता. त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने यांना फक्त दंड नाही तर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी कामत यांनी केली आहे. जसे मायनिंग पिडीतांच्या आंदोलकांनंतर ड्रोन आणि छायाचित्रांच्या आधारे कारवाई केली तशीच छायाचित्रांद्वारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कामत यांनी केली आहे. कठोर कारवाई करून सर्वांसाठी कायदा समान असल्याचे प्रमाण सरकारने द्यावे आणि सत्तेचा माज चढलेल्या नेत्यांना वेळीच आळा घालण्याची गरज असल्याचे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकार परिषदेत विद्यार्थी विभागाचे  मंथन रंकाळे, संकेत रायकर, आशीष कदम आणि आकाश कांबळे हजर होते.