चीनने भारतीय प्रदेश बळकावून देखील पंतप्रधानांचे त्याकडे दुर्लक्ष :काँग्रेसचा आरोप 

0
664
गोवा खबर: केंद्रातील  मोदी सरकार पापी चिनी लष्कराने ताब्यात घेतलेल्या अमयार्द भारतीय प्रदेशाकडे अजूनही दुर्लक्ष करीत असल्याची टीका आज प्रदेश काँग्रेसाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
चिनी फौजांनी गल्वान खोरे, पॅंगोग टीएसओ तळे क्षेत्र, गरम पाण्याचे झरे आणि व्हाय जंक्शनपर्यंत देस्पांग सखल भूक्षेत्र काबीज केले असल्याचा आरोप देखील चोडणकर यांनी केला.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार भारतीय प्रदेशावर चीनने अतिक्रमण केलेलेच नाही किंवा चिनी फौजांनी भूप्रदेशावर कब्जा मिळवलेला नाही असा दावा करून राष्ट्राची दिशाभूल करीत आहे आणि त्यान्वये चीनचा डाव यशस्वी करण्यास हातभार लावत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा राष्ट्रावर केलेला घोर अन्याय, मोठे दुष्यकृत्य असल्याचा घणाघात त्यांनी फेसबुक लायव्हद्वारे माध्यमाशी बोलताना केला आहे.
चीनची अलीकडील आगळीक सर्वश्रृत असून २०१३ साली वाय जंक्शनपर्यंत देस्पांग भूक्षेत्र काबीज करणे, २०१४ साली लडाखमधील चुनार येथे पाँयंट ३० आर पोस्ट ताब्यात घेणे , २०१७ साली डोक्लाम पठाराचा कब्जा करण्यात आला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
प्रत्येक वेळी चार वेगवेगळ्या ठिकाणच्या चिनी अतीक्रमणाबद्दल प्रश्न विचारताच मोदी सरकार, भाजप मात्र फसवी उत्तरे देऊन देशवासियांचे चित्त विचलित करण्याचे प्रयत्न करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्र हीतासाठी काँग्रेस पक्ष तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणार आहे हे लक्षात असू द्या असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
 पंतप्रधानाना चीनबद्दल विशेष आस्था असल्याचे सगळेच जाणतात, गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी चीनचे चारवेळा केलेले दौरे चीनशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे संकेत देतात , पाचवेळा चीन दौऱ्यावर जाणारे ते एकमेव पंतप्रधान आहेत याची आठवण चोडणकर यांनी करून दिली आहे.
सगळ्यात चिंताजनक आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादाक अशी गोष्ट म्हणजे अलीकडे पंतप्रधानांच्या पीएम केअर्स  निधीसाठी चीनी कंपन्यांनी दिलेल्या देणग्या. या पीएम केअर्स निधीची घटनात्मक रचना काय आहे, निधी कोठे, कसा खर्च केला जाणार, त्यावर कोणाचे नियंत्रण आहे हे स्पष्ट नाही. हा निधी सार्वजनिक अधिकक्षेत येत नसल्याचे पंतप्रधानाच्या कार्यालयाने जाहीर केले आहे. महालेखापाल, हिशेब तपासनिस पीएम केअर्सला लागणार नाही . थोडक्यात सांगायचे झाल्यास हा निधी पंतप्रधान आपल्या मर्जीनुसार गुप्तपणे वापरणार असून पारदर्शकता, हिशेबी तत्वांना तेथे थारा नसल्याचे दिसत असल्याचा आरोप चोडणकर यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या वादग्रस्त निधीत २० मे, २०२० रोजी पंतप्रधानांना ९६७८ कोटी रुपये मिळालेले आहेत. जरी भारतीय क्षेत्रात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी केली तरी चीनी कंपन्यांकडून पंतप्रधानांनी निधी स्वीकारला आहे ही धक्कादायक गोष्ट असल्याचे मत चोडणकर यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधांनाना काही प्रश्नही चो़डणकर यांनी केले असून त्या प्रश्नांची पंतप्रधांनानी उत्तरे द्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
२०१३ साली चीनने घुसखोरी केलेली असताना चीनी कंपन्यांकडून पीएम केअर्ससाठी निधी पंतप्रधांनांनी का स्वीकारला?
चीनमधील हुआवे या वाद्रग्रस्त कंपनीकडून पंतप्रधांनाना ७ कोटी रुपये मिळाले आहेत का?
चिनमधील पिपल्स लिबरेशन आर्मीशी या वादग्रस्त कंपनीचे संबंध आहेत का ?
टीक टाॅकची मालकी असलेल्या चीनी कंपनीने ३० कोटी रुपयांची देणगी पीएमकेअर निधीत जमा व्हावे म्हणून हातभार लावला आहे का ?
३८ टक्के चीनी भागिदारी असलेल्या पेटीएमने १०० कोटी रुपये निधीसाठी दिले का?
शिओमी या चिनी कंपनीने निधीसाठी १५ कोटी रुपयांचे आश्वासन दिले आहे का ?  चिनी आॅप्पो कंपनीने १ कोटी रुपयांची देणगी वादग्रस्त निधीत जमा केली का?
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय निधीसाठी आलेली रक्कम पीएमकेअर्समध्ये वळवली आहे का? वळवली असेल तर ती किती कोटी रक्कम आहे?
भारतीय भूक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्या चीनमधील कंपन्यांकडून देणगीच्या स्वरुपात पंतप्रधान निधी स्वीकारत राहीले तर चिनी फौजांचे आक्रमण झाल्यास ते देशाला संरक्षण कसे देऊ शकणार ? या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदीजींडून राष्ट्राला अपेक्षित असून ते द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.