चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी एसओपी केली जारी;चित्रपटगृहांना 50% आसनक्षमता वापरण्याची अनुमती

0
326

गोवा खबर:केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज चित्रपट प्रदर्शनासाठी एसओपी जारी केली.  आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाशी चर्चेनंतर ही एस ओ पी निश्चित करण्यात आली आहे. “गृहमंत्रालयाच्या निर्णयानुसार 15 ऑक्टोबर 2020 पासून चित्रपटगृहे खुली होतील. त्यादृष्टीने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही सामायिक मानके प्रक्रिया  (एसओपी) तयार केली आहेत.

यातील प्रमुख मार्गदर्शक तत्त्वे ही आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने दिलेल्या नियमानुसार आहेत. यामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचे आणि कर्मचाऱ्यांचीही तापमान तपासणी, पुरेसे शारीरिक अंतर राखणे,  मुखपट्टीने चेहऱा झाकणे, सातत्याने हात धुणे,  हँड सॅनिटायझरचा वापर, कर्मचाऱ्यांची सुरक्षा, बाहेर पडण्यासाठी ठराविक मार्ग इत्यादी आहेत. एकूण क्षमतेच्या पन्नास टक्केच आसनक्षमता वापरली जाईल याची व्यवस्था इत्यादींचा समावेश आहे. मल्टिप्लेक्स मधे चित्रपटाच्या खेळांच्या वेळा एकापाठी एक न ठेवता विखूरलेल्या असाव्यात. चित्रपटगृहातील तापमान 24०C तरी ते 30०C दरम्यान असणे आवश्यक.

चित्रपट प्रदर्शनाला सुरूवात करतानाच सर्व राज्ये व संबंधितांनी   ह्या मार्गदर्शक सूचनांचा आणि एसओपीचा वापर करावा.

चित्रपटांचे प्रदर्शन सुरू करणे ही मोठी आर्थिक घटना असून आपल्या देशाच्या जीडीपीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. आताच्या कोविड-19 प्रकोपाच्या पार्श्वभूमीवरही चित्रपट प्रदर्शन सुरु करताना सर्व संबंधितांनी महामारी पसरू नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

गृहमंत्रालयाने 30 सप्टेंबर 2020 ला चित्रपटगृहे, थिएटर, मल्टीप्लेक्स उघडण्यासाठी जारी केलेल्या याव्यतिरिक्तच्या  मार्गदर्शक तत्वां (inter alia ) नुसार  कन्टेनमेंट झोनबाहेरील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबर-2020 पासून उघडली जातील. यासंदर्भातील सविस्तर रिपोर्ट खालील लिंकमध्ये वाचता येईल.