चित्रपटांना सार्वजनिक भाषा-सिनेदिग्दर्शक शाजी एन करुण

0
1360

महिलांच्या हालअपेष्टांविषयी समाजाला क्वचितच जाणीवखरवसद्वारे यासंदर्भात जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न – आदित्य सुहास जांभळे

 

 गोवा खबर:चित्रपटांना एक सार्वजनिक वैश्विक भाषा असते, असे सांगून मल्याळी चित्रपट ‘ओलू’ साठी भाषेचा अडथळा न जाणवता त्यातला संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल असा विश्वास मल्याळी चित्रपट दिग्दर्शक शाजी एन करुण यांनी व्यक्त केला. महिलांच्या हालअपेष्टांविषयी समाजाला क्वचितच जाणीव आढळते. या महत्वाच्या सामाजिक मुद्याबाबत जागृती करण्याचा प्रयत्न ‘खरवस’ या चित्रपटातून केल्याचे या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांनी सांगितले.

49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमाची फिचर फिल्म विभागात ‘ओलू’ तर कथाबाह्य चित्रपट विभागाची ‘खरवस’ या चित्रपटाने सुरुवात झाली. त्यानंतर या दोनही चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी इफ्फीच्या मिडिया सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषदेत आपापल्या चित्रपटासंदर्भात संवाद साधला. चित्रपटाचे मूळ काम हे एखाद्या चित्राप्रमाणे असते. दुसऱ्या भाषेत त्याचे संवाद डब केल्यास त्याचे सौंदर्य हरवू शकते असे मत शाजी यांनी व्यक्त केले. ‘ओलू’ हा वास्तव आणि कल्पना यांचे मिश्रण असलेला चित्रपट आहे. माया या भटक्या मुलीला तिच्यावर बलात्कार करुन केरळच्या बॅक वॉटरमधे बुडवल्यानंतरही ती गूढरित्या जिवंत राहते. वासू या युवा चित्रकाराशी तिची भेट होते. तिच्या प्रोत्साहनामुळे त्याच्या जीवनात मोठा बदल घडवून आणणाऱ्या चित्रकृतींची वासूकडून निर्मिती होते. या चित्रपटात पाण्याखालची अनेक दृश्ये असल्यामुळे त्याच्या चित्रीकरणासाठी या चित्रपटाचे कलाकार आणि इतर चमुने मोठे परिश्रम घेतल्याचे शाजी यांनी सांगितले. चित्रपटाचे व्हीएफएक्स काम पूर्ण करण्यासाठी सहा ते सात महिने लागले. पाण्याखाली चित्रीकरणामुळे ध्वनीसह इतर तांत्रिक बाबींची काळजी घेणे आवश्यक असल्याने निर्मिती प्रक्रिया आव्हानात्मक ठरल्याचे ते म्हणाले.

मातृत्वाचा अनुभव व्यक्त करणाऱ्या संमिश्र भावना हा ‘खरवस’ चित्रपटाचा सहा मिनिटाच्या कळ साध्यायाचे चित्रीकरण करण्यासाठी वीस तास लागले. आसावरी ही चित्रकार असून मृत बाळाला जन्म दिल्यानंतर या दु:खद घटनेतून बाहेर पडण्यासाठी तिची घालमेल सुरु असताना कोकणातल्या तिच्या पूर्वजांच्या घरी गेल्यानंतर तिथल्या गोठ्यातल्या गाभण गाईविषयी तिला कळतं आणि आपल्या दु:खातून बाहेर येण्यासाठी तिला मदत होते. या गाईच्या दुधापासून तयार केलेला खरवस या चित्रपटाची भावनिक आशय घनता रेखाटतो.