चिंचिणीमध्ये आपच्या वीज आंदोलनात स्थानिक मोठ्या संख्येने सामील

0
276
गोवा खबर : आपचे नेते संदेश तेलेकर यांनी चिंचिणी येथील रहिवाशांसमोर आपचे राष्ट्रीय नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने केलेल्या विविध कल्याणकारी कामांवर प्रकाश टाकणारे दिल्लीचे सुशासन मॉडेल ठेवले.
त्यांनी दिल्लीतील विद्युत मॉडेलवर प्रकाश टाकला, जिथे २०० युनिट्स पर्यंत विनामूल्य वीज आणि २०१ ते ४०० युनिट वापरणाऱ्यांसाठी ५० टक्के सूट दिली जाते. दिल्लीमधील जागतिक स्तरीय वैद्यकीय सुविधा, उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा व शैक्षणिक धोरणे यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
त्यांनी आपल्या सरकारकडून त्यांना काय अपेक्षा आहे याबद्दल जनतेला विचारले असता, आम्हालाही गोव्यात केजरीवाल मॉडेल हवे असल्याचे बहुतेक स्थानिकांनी सांगितले.
महिला क्षेत्राकडे लक्ष देताना ते म्हणाले की, दिल्लीतील महिलांच्या वाहतुकीच्या सर्व खर्चाची दिल्ली सरकारच जबाबदारी घेते -त्या सार्वजनिक वाहतुकीद्वारे दिल्लीत कोठेही मोफत प्रवास करू शकतात. आम्ही गोव्यामध्येही असे करू शकतो, असे ते म्हणाले.
नि: शुल्क वायफाय योजना : आपण आपले अर्धे काम फोनवरुन आणि घरातून करतो, तसेच डेटा खरेदी करण्यासाठी अमाप पैसे खर्च करतो,पण दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांनी ११ हजार वायफाय हॉटस्पॉट्स बसवण्याची योजना आखली असून त्याचे काम चालू आहे, याचा फायदा घरातून काम करणाऱ्या बहुतेकांना होईल, तसेच आमची मुले जी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत त्यांना आणि तरुण वर्गाला त्यांच्या प्रकल्पात देखील याचा फायदा होईल.
त्यांनी तीर्थयात्रा योजनेचा उल्लेख केला, ज्यात बहुतेक करून आमचे वृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिक विविध तीर्थक्षेत्रांची किंवा उपासनास्थळांची भेट घेण्याची इच्छा बाळगतात, त्यांची ही इच्छा दिल्ली सरकार मुळे पूर्ण झाली आहे आणि वर्षाकाठी ७५ हजार ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होईल, गोव्यात आपल्याकडे अशा योजना का नाहीत, ज्यायोगे आमच्या गोयंकरांना फायदा होईल.
ते म्हणाले की, साथीच्या रोगादरम्यान आपल्यातील बहुतेक लोक आपली नोकरी, व्यवसाय गमावून बसले आहेत आणि आपल्या कुटुंबाला मूलभूत गरजा पुरवणेही कठीण झाले आहे.
यावेळी आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एकीकडे २,५०० रुपयेची योजना थांबविली,तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत ही योजना २,५०० ते ५,००० रुपया पर्यंत वाढवली. लॉकडाऊन दरम्यान सामना करण्यास अडचणी येत असलेल्या टॅक्सी चालक, ऑटो रिक्षा चालक, बांधकाम मजुरांनादेखील अरविंद केजरीवाल यांनी आर्थिक मदत म्हणून ५,००० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात वर्ग केले.
गोवा आणि दिल्लीचे अर्थसंकल्प त्यांनी चिंचिनीच्या रहिवाशांना समजावून सांगितले, गोव्याचे वार्षिक बजेट २१ हजार कोटी असून गोव्याची लोकसंख्या १५ लाख आहे, म्हणून गोव्यातील भाजपा सरकार दरमहा एका गोयंकरावार १ लाख ४० हजार खर्च करते, परंतु त्यांनी रहिवाशांना विचारले की, तुम्हाला हे पैसे आपल्यावर खर्च केले असे वाटेल का.
दुसरीकडे दिल्लीचे बजेट ६० हजार कोटी आहे आणि लोकसंख्या २ कोटी आहे, म्हणून दिल्ली सरकार प्रत्येक दिल्लीकरावर ३,०००० रुपये खर्च करते, तरीही यात बऱ्याच योजना व कल्याणकारी सुविधा पुरवण्याचे काम करते.
हे पैसे कोठे जात आहेत, याबद्दल आपल्याला काय वाटते? आमचे सावंत सरकार गोव्याच्या फायद्यासाठी हे पैसे का खर्च करीत नाही? त्यांनी लोकांना यावर निर्णय घेण्यास सांगितले आणि स्वच्छ आणि प्रामाणिक कारभार देणाऱ्या आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्यास सांगितले आणि हेच कारण आहे की, ज्यामुळे आप २०२० मध्ये पुन्हा दिल्लीत सत्तेत आली.
जर तुम्हाला चिंचिणीमध्ये बदल हवा असेल, चिंचिणीमध्ये विकास घडायचा असेल, तुमच्या मुलांचे चांगले भविष्य हवे असेल, तर याबद्दलचा निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे. गोव्यात बदल घडवून आणण्यासाठी उभे रहा आणि आपचे समर्थन करा.