चार शहरातुन जाणारी १०० किमी अंतराची ट्रायगोवा राईड १७४ सायकलपटूंनी पूर्ण केली

0
274

सायकलस्वारांच्यात नौदलातील वडील आणि शाळेला जाणाऱ्या दोन मुलांचा समावेश.


गोवा खबर:रविवारी गोव्यामध्ये पार पडलेल्या ट्रायगोवा फोर सिटी या १०० किमी अंतराच्या सायकल राईडला १७४ सायकलस्वारांनी पूर्ण केले.

विशेष आकर्षण म्हणजे वास्को येथील भारतीय नौदलातील कमांडर दिपक वर्गीस आणि शारदा मंदिर शाळेत शिक्षण घेणारी त्यांची दोन मुले म्हणजेच फ्रेडरिक (वय १३ वर्षे) आणि फर्डिनांड (वय १० वर्षे) यांनी एकत्रितपणे हि राईड उत्कृष्टपद्धतीने पार पाडली.

यशस्वी फिनिशर्समध्ये चार शालेय मुलांचा आणि 13 महिलांचा समावेश होता. कमांडर वर्गीस म्हणाले, माझी पत्नी तिजी आणि मी आम्ही दोघेही नियमितपणे सायकल चालवतो. आमच्या दोन्ही मुलांनी लहान वयात त्यांची पहिली 100 कि.मी. सायकल राईड यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद आम्हाला अतिशय झाला आहे. सायकल राईड पूर्ण करणाऱ्यांची मडगाव (५८), पणजी (५२), फोंडा (४८), वास्को (१६) अशी शहरानुरूप संख्या आहे.

रविवारी ट्रायगोवा फाउंडेशनचे संस्थापक राजेश मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हि १०० किमी राईड अतिशय वेगळी होती कारण सायकलस्वार पणजी, मडगाव, वास्को किंवा फोंडा यापैकी त्यांना आवडणाऱ्या कोणत्याही शहरातून हि राईड सुरु करू शकत होते.

ज्या शालेय मुलांनी हि सायकल राईड पूर्ण केली त्यांच्यामध्ये फर्डिनांड वर्गीस (१० वर्षे), कृष्णा गावणेकर (११ वर्ष), अक्षत शेट्टी (१२ वर्ष) आणि फ्रेडरिक वर्गीस (१३) यांचा समावेश आहे.

१३ यशस्वी महिला सायकलस्वारांमध्ये मिका फर्नांडिस, मेगन फर्नांडिस, नताशा शर्मा, नलिनी कार्दोजो, दिव्या, पूजा म्हापसेकर, स्वाती पालेकर, रेबेका जॉर्ज, रोहिणी शेटकर, साक्षी वेर्णेकर, रक्षा वेर्णेकर, अनुजा नेगी आणि रोहिणी शेटकर यांचा समावेश आहे.

ट्राय गोव्यातर्फे सायकल राईडच्या मार्गावर न्याहारी आणि नाश्त्याची व्यवस्था केली होती आणि सर्व फिनिशर्सना ट्रायगोवाकडून एक पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. २२ नोव्हेंबर २०२० रोजी ट्रायगोवा ब्रेव्हेट पॉप्युलर १०० किमी आणि बीआरएम २०० किलोमीटर राईड्स आयोजित केल्या आहेत.