चक्रीवादळामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

0
449


जनतेला सुरक्षा उपायांसह सावधगिरी बाळगण्याचे केले आवाहन

 

गोवा खबर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या चक्रीवादळामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी नागरिकांना शक्य ती सर्व सावधगिरी बाळगण्याचे तसेच सुरक्षा उपाययोजना करण्याचे आवाहन केले.

“भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागातील चक्रीवादळामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करत आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की, त्यांनी शक्य ती सर्व सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षा उपाय करावेत.”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.