घाऊक किंमतींवर आधारित चलनफुगवट्याच्या दरात मार्च महिन्यात वाढ 

0
1299

गोवाखबर:मार्च महिन्यात घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 2.47 (अंदाजित) टक्के राहिला. या आधीच्या महिन्यात हा दर 2.48टक्के होता.

अन्नधान्यासाठीच्या चलनफुगवट्याच्या निर्देशांकात 0.4 टक्के घट होऊन तो 137.2 टक्के झाला. या आधीच्या महिन्यात तो 137. 8 होता. अंडी,चहा, कॉफी, पोलट्री चिकन, मसाले, राजमा, मसूर, बाजरी, फळे आणि भाजीपाला यांच्या किंमतीत घट दिसून आली. तर नाचणी, ज्वारी, चवळी,मूग, गहू यांच्या किंमतीत वाढ दिसून आली.

अखाद्य वस्तू गटाच्या निर्देशांकात 0.3 टक्क्यांची घट होऊन तो 120.2 झाला. खनिज गटाच्या निर्देशांकात 2 टक्क्यांची घट झाली. कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू गटाच्या निर्देशांकात 0.5 टक्के घट झाली.

उत्पादन क्षेत्राच्या निर्देशांकात 0.4 टक्के वाढ झाली.