घरोघरी सर्व्हेक्षणासाठी प्रश्नोत्तरी

0
482

गोवा खबर:गोवा सरकाराने संपुर्ण राज्यात आयएलआयच्या लक्षणांची निश्चती करण्यासाठी घरोघरी सर्व्हेक्षण आयोजित करण्याचे ठरविले आहे. बीएलओ, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी आणि मीटर रीडर/ ग्राम सेवक / अबकारी गार्ड अशा चार जणांचा गट तयार केला आहे. सदर गट हा 13 ते 15 एप्रिल 2020 पर्यंत प्रत्येक घरातील आयएलआयची लक्षणे असलेल्यांची माहिती एकत्रित करील. मोबाईल ऍपद्वारे माहितीचे संकलन आणि मॅपिंग केले जाईल.

वाडा/वॉर्ड, घरातील ज्येष्ठ कुटुंबियांचे नाव व मोबाईल क्रमांक, घरातील कोणा व्यक्तीला ताप, सर्दी आणि कोणा व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास  होत असल्यास अशी लक्षणे असलेली व्यक्ती जर कोणा कुटुंबीयांच्या संपर्कात आले असल्यास किंवा अशी व्यक्ती जी 15 फ्रेबुवारी 2020 नंतर प्रवास करून गोव्यात आले असल्यास असे प्रश्न सदर गट सर्व्हेक्षणा दरम्यान प्रश्न विचारतील.

जर कुटुंबीयातील कोणा व्यक्तीला मधुमेह, हृदय रोग, उच्च रक्तदाब, किडनी आजार किंवा श्वसन आजार असल्यास त्यांचीही माहिती घ्यावी. त्याचबरोबर कुटुंबीयातील ज्येष्ठ व्यक्ती आणि अन्य कुटुंबीयाचे वय याबद्यलची माहिती घ्यावी.

कोव्हीड-19 या रोगाला आवर घालण्यासाठी लोकांनी योग्य माहिती पुरविण्याचे सहकार्य करावे.