ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूटच्या इंटरनॅशनल ट्रेड ट्रेनिंगचा गोमंतकीयांना लाभ

0
717

 

ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूटची पहिली वाणिज्य प्रशिक्षण तुकडी डिसेंबर 2019 मध्ये प्रशिक्षण  घेणार

 

गोवा खबर : गोव्यातील युवा वर्गाला रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अहमदाबाद येथील ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूट (जीएनआय) च्या मुख्य शाखेने गोव्याच्या मातीत पाऊल ठेवण्यासाठीची सज्जता दर्शविली आहे. गोव्यातील आंतरराष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण उपक्रमाचे पहिले प्रशिक्षण डिसेंबर 2019 मध्ये सुरू होईल.

 

संपूर्ण भारतासह व परदेशात यशस्वीरित्या १४८ पेक्षा अधिक प्रशिक्षणाचा भारतातील ४०४६ आणि परदेशातील ४०० विद्यार्थ्यांना लाभ झाला आहे. या प्रशिक्षणामुळे त्यापैकी १२०० विविध क्षेत्रातील निर्यातक बनले आहेत.

जीएनआयमुळे गोमंतकीयांना आंतरराष्ट्रीय बाजार धोरण, बाजाराच्या संशोधनावरील खेळ, व्यापार भागीदारांची निवड करणे, ऑनलाइन ई-कॉमर्स एक्सपोर्ट्स, एक्सपोर्ट प्राइसिंग, फॉरेक्स, शिपिंग प्रक्रिया आणि इतर विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. गोमंतकीय व्यवसाय स्थापित करण्यासाठी आणि त्या व्यवसायाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी व्यावहारिक माहितीही देण्यात येईल.

 

गुजरात राज्यातून सुरू झालेल्या व्हायब्रंट एक्स्पो मालिकेच्या यशानंतर ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूट गोवा राज्यातही चांगल्या गुणांकणाची अपेक्षा ठेऊन आहे. त्यांचे ध्येय स्पष्ट आहे. युवकांना, महिलांना, एसएमइसह गोव्यातील समुदायांचे सबलीकरण करण्यासाठी जागतिक बाजारपेठेत अन्वेषण हा उत्तम मार्ग आहे. त्यांच्या केंद्रात देण्यात येणारे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय व्यापार कौशल्य वाढवेल आणि त्यामुळे जागतिक व्यापारातील यशही वाढेल.

 

ज्यांना गोव्यातील उद्योग क्षेत्र उच्च स्थानावर नेण्यासाठी योगदान द्यायचे आहे त्या उत्पादक, व्यापारी, व्यावसायिक, कौटुंबिक मालकीचे व्यवसायिक आणि विद्यार्थ्यांसाठी हा प्रशिक्षण उपक्रम महत्वाचा असल्याचे ग्लोबल नेटवर्कचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. जगत शाह यांनी सांगितले.

 

गोमंतकीय तरुण करियरच्या वेगवेगळ्या संधीसाठी युरोपियन देशांमध्ये आणि देशातील इतर भागात स्थलांतर करीत आहेत. राज्यात रोजगार निर्माण करून राज्याच्या विकासात हातभार लावणे शक्य आहे.

भौगोलिकदृष्ट्या लहान राज्य असूनही, गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्याप्रती नेतृत्व करण्याची क्षमता आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विस्तृत व्याप्तींचा समावेश आहे ज्यामुळे निर्यातीच्या आव्हानात्मक आणि संमिश्र जगामध्ये स्पर्धात्मक आघाडी मिळविण्यात मदत होईल. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी वय आणि शिक्षणाची मर्यादा नाही, इंग्रजीचे ज्ञान आवश्यक आहे.

 

शाह पुढे म्हणाले की, व्हायब्रंट गोवा राज्यात गुंतवणूक आणण्यास आणि गोमंतकीय कंपन्यांमधून निर्यातदार तयार करण्यात मदत करेल. “गोव्याच्या कंपन्यांना गोव्यात बसून व्यवसाय आणि कौशल्याच्या जोरावर जगभरात व्यवसाय करण्याची संधी मिळेल.

 

 

ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूटबद्दल

आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थापनासाठी प्रशिक्षण शिक्षणसंस्था म्हणून 1997 मध्ये ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूटची स्थापना झाली. एसएमई, कॉर्पोरेट्स आणि कारागीर यांना प्रशिक्षण देण्यासाठी हि इन्स्टिट्यूट अग्रगण्य प्रशिक्षण संस्था म्हणून ओळखली जाते. ग्लोबल नेटवर्क इन्स्टिट्यूटने (जीएनआय) भारत आणि परदेशात ४५० अधिक कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. जीएनआयने आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्थापनात सर्टिफाइड इंटरनॅशनल ट्रेड एक्सपर्ट (सीआयटीई) च्या १४८ तुकड्यांना प्रशिक्षित केले आहे.  त्याशिवाय व्यापार व गुंतवणूक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे

 

डॉ. जगत शाह यांच्याबद्दल:

डॉ. जगत शाह हे भारतातील कॅनडाच्या मॅनिटोबा सरकारचे माजी परराष्ट्र प्रतिनिधी आहेत. विविध संस्था व संस्थांचे अध्यक्ष, संस्थापक आणि मुख्य मार्गदर्शक म्हणून ते विविध पदांवर कार्यरत आहेत. ते युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया इम्पोर्टर्स काउन्सिल (यूएसआयआयसी) चे उपाध्यक्ष, चीन इंडिया ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सेंटर (सीआयटीआयसी) चे सरचिटणीस आणि जर्मन इंडियन बिझिनेस सेंटर (जीआयबीसी) चे सहयोगी संचालक आहेत

 

आंतरराष्ट्रीय व्यापार विषयात एमबीए असणारे शाह एक प्रमाणित क्लस्टर डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर, प्रशिक्षित आणि यूएनआयओ / आयएलओ ट्यूरिन, इटलीद्वारे प्रमाणित आहे. सूरतच्या इंडियन डायमंड इन्स्टिट्यूटमधून डायमंड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी पदवी संपादन केली आहे आणि अमेरिकेच्या आयसीएमसीआयमधून प्रमाणित व्यवस्थापन सल्लागार आहेत.

 

शाह याना आंतरराष्ट्रीय बाजारात आणि गुंतवणूकीच्या रणनीतींवर काम करण्याचा २३ वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या आयएसओ प्रमाणित आर्थिक विकास एजन्सीद्वारे त्यांनी दारिद्र्य निर्मूलनासाठीही काम केले आहे आणि २० पेक्षा जास्त देशांमधील सरकार आणि खाजगी क्षेत्रासोबत अनेक लघु व मध्यम उद्योगांसाठीही काम केले आहे. ग्लोबल नेटवर्क ही आंतरराष्ट्रीय व्यापार सल्लागार कंपनी असून या देशासह परदेशातून ११४ व्यापार आणि गुंतवणूकीचे प्रतिनिधीत्व झाले आहे.

 

नफा न मिळवण्याहेतूने व्यावसायिकदृष्ट्या चालवल्या जाणार्‍या, ‘क्लस्टर पल्स’ या आर्थिक विकास एजन्सी चालविण्याव्यतिरिक्त, जगत शाह हे  १८ राज्यात चालविण्यात येणाऱ्या ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेचे सल्लागार आहेत. सध्या ते ‘स्टार्ट अप’ वरही कार्यरत आहेत.