ग्रामीण स्वच्छतेसाठी स्वच्छथॉनचे आयोजन

0
963

केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाकडून ग्रामीण स्वच्छतेसाठी स्वच्छथॉन 1.0- स्वच्छ भारत हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आठ सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका स्वीकारल्या जातील. 2ऑगस्ट2017 पासून प्रवेशिका http://innovate.mygov.in/swachhathon-1.0/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

स्वच्छ भारत हॅकेथॉनमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील युवकांच्या नवकल्पनांना प्राधान्य दिले जाणार आहे. यात अ) नवोन्मेषी, शाश्वत, पर्यावरणपूरक आणि परवडणाऱ्या किंमतीतील शौचालय जे डोंगराळ प्रदेश, पूरग्रस्त भाग, कोरडा आणि दूरवरचा प्रदेश यात कामी येईल ब) शौचालयाचा वापर होतो की नाही हे पाहण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत क) लोकांच्या वर्तणूकीतील बदल आणि शौचालयाचा वापर आणि स्वच्छतेसंदर्भात तंत्रज्ञानाची मदत ड) शाळांमधील शौचालयांमध्ये सुधारणांसाठी विविध प्रारुपांची निर्मिती इ) मासिक आरोग्य व्यवस्थापनासंदर्भात नवकल्पना फ) शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत या उपक्रमांचा समावेश असणार आहे.