ग्रामीण डिजिटल क्रांतीच्या दिशेने इफ्को सुरु करत आहेत नाविन्यपूर्ण, परस्परसंवादी “इफ्को आयमंडी अॅप”

0
1302

 

 

~इफ्को आयमंडी 55 दशलक्षहून अधिक शेतकऱ्यांना सेवा प्रदान करेल आणि ते भारताचे सर्वांत मोठे ग्रामीण ई-कॉमर्स मंच होऊ शकते~

 

गोवा खबर: सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठे खत उत्पादक असलेल्या इफ्कोने “इफ्को आयमंडी” हे सामाजिक ई-कॉमर्स अॅप आणि पोर्टल सुरु करून शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी आणि त्यांनी डिजिटल पद्धतीने जोडण्यासाठी आणखी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. हे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या “डिजिटल भारता”च्या स्वप्नाच्या एकवाक्यतेत आहे. यापुढे इफ्कोचे सर्व डिजिटल उपक्रम इफ्को इफ्को आयमंडी मंचावर उपलब्ध असतील.

 

आयमंडी ही इफ्कोची 100% उपकंपनी असलेल्या इफ्को ईबझार लि. ने आयमंडी प्रा.लि. या सिंगापूर स्थित तंत्रज्ञान कंपनीमध्ये केलेली धोरणात्मक गुंतवणूक आहे. ही कंपनी कृषी उद्योग आणि मोबाईल/इंटरनेट तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रचंड अनुभव असणाऱ्या अनुभवी व्यावसायिकांद्वारे चालविण्यात येते. या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे डिजिटल तंत्रज्ञानाचे लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचविणे आणि ग्रामीण भारतात डिजिटल क्रांती घडवून आणणे.

 

इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू.एस.अवस्थी म्हणाले, “भारतभर ऑनलाईन व डिजिटल व्यवहारांच्या उपयोगासाठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता पसरविण्याची मोहीम राबविल्यानंतर आम्हाला ‘इफ्को आयमंडी’ अॅप सादर करण्यास अतिशय आनंद होत आहे. येथे शेतीशी संबंधित माहिती व उत्पादन, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, कर्जे, विमा, इ. सर्व “एकाच ठिकाणी” उपलब्ध होईल. आयमंडी शेतकऱ्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करेल आणि 55 दशलक्ष शेतकऱ्यांना सेवा प्रदान करेल.”

 

आयमंडी प्रा.लि.चे संस्थापक श्री व्ही.के.अगरवाल म्हणाले, “इफ्को आणि आयमंडीला खात्री आहे की या भारतीय सहकारी डिजिटल मंचाच्या योगे ते प्रत्येक घरात, प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन घडवून आणतील आणि आपल्या समावेशक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक दशलक्ष लोकांच्या जीवनात शक्तीचा संचार करतील.”

 

हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येईल. त्यामुळे, इफ्कोच्या 55,000हून जास्त विक्री केंद्रे, 36,000 सहकारी संस्था, 30,000हून अधिक गोदामे आणि भारताच्या तृतीयांश असलेल्या 16,000 पिन कोड्सवरील 250 दशलक्ष ग्रामीण ग्राहकांपर्यंत पोचू शकण्याच्या सोयीचा उपयोग करून आयमंडी हा भारतातील सर्वांत मोठे ग्रामीण सामाजिक ई-कॉमर्स मंच ठरेल.

 

आयमंडी हे अँड्रॉईड आणि iOS फोन्ससाठी प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवर डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे आणि ते वेबवर www.iffcoimandi.in येथेही उपलब्ध आहे. विविध बाजारांच्या मार्फत गरजांची पूर्तता करण्यासोबतच शेतकऱ्यांना वेळ घालविण्यासाठी यात संवाद (चॅट व कॉलिंग), मनोरंजन आणि माहिती/सल्लासुद्धा आहे. यातील सामाजिक व संवाद वैशिष्ट्यांमुळे वेगवेगळ्या भागांमधील लोक एकाच मंचावर एकमेकांशी जोडले जाऊ शकतात. वापरकर्ते आपापल्या आवडीनुसार विविध मंचांमध्ये सामील होऊ शकतात; ते तज्ञांशी बोलून आपल्या अडचणींबद्दल सल्ला घेऊ शकतात. एवढेच नव्हे, तर ते आपल्या यशोगाथाही इतरांपर्यंत पोचवू शकतात.

 

शेतकी माहिती बाजारांतर्गत, शेतकरी सध्या खते (रसायने, डब्ल्यूएसएफ, जैविक, जीव, इ.), कृषी रसायने आणि बियाणे इ. सह इफ्कोची सर्व उत्पादने सवलतीच्या दरांवर खरेदी करू शकतात आणि निःशुल्क आपल्या घरी ते प्राप्त करू शकतात. शेतकरी हे व्यवहार मोबाईल अॅप, वेब पोर्टलद्वारे किंवा 1800 2000 344 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून कॉल सेंटरच्या मदतीने करू शकतात.

 

ते चॅट, ऑडीओ व व्हिडीओ द्वारे आपल्या मित्रांच्या व कुटुंबाच्या संपर्कात राहू शकतात आणि चॅट किंवा आपल्या फीडवर छायाचित्रे आणि व्हिडीओ टाकू शकतात. संवाद साधने पूर्णपणे सुरक्षित आणि खाजगी आहेत.

 

वापरकर्ते त्यांना पाठविण्यात येणारे व्हिडीओ पाहून तसेच हवामान, बाजारभाव व दैनंदिन बातम्यांशी संबंधित वेळोवेळी प्रसारित केलेली जाणारी माहिती बघून स्वतःचे मनोरंजन करू शकतात. याशिवाय, ते आपल्या पसंतीच्या स्थानिक व राष्ट्रीय आकाशवाणी केंद्रांचे कार्यक्रमही ऐकू शकतात.

 

नजीकच्या भविष्यात शेतकरी आपले उत्पादन सर्वोत्तम किमतीत ऑनलाईनही विकू शकतील. आयमंडीद्वारे कर्जे, विमा, इ. सारख्या विविध वित्तीय सेवांचाही लाभ घेता येईल.

 

काही काळाने अनेक सामाजिक सेवाही सुरु करण्यात येतील; ते ऑनलाईन शिक्षण व कौशल्य विकासकार्यक्रमांचाही लाभ घेऊ शकतील तसेच रोजगार शोधण्यासाठीही या अॅपचा उपयोग करू शकतील. ते या अॅपच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवाही प्राप्त करू शकतील.

 

आयमंडी अॅपच्या अनोख्या रचनेमुळे ते 2जी आणि 3जी अशा दोन्ही प्रकारचा फोन्सवर वापरता येते. भारतातील सर्व शेतकऱ्यांना सेवा देता यावी म्हणून हे अॅप हिंदी व इंग्रजीव्यतिरिक्त आणखी 10 क्षेत्रीय भाषांमध्ये उपलब्ध असेल. याची रचना जागतिक दर्जे लक्षात घेऊन आणि ग्रामीण भारतातील लोकांना नजरेसमोर ठेवून करण्यात आलेली आहे.