ग्रामसभांची मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न हाणून पाडू:काँग्रेस

0
1885
गोवा खबर:सरकारच्या चुकीच्या धोरणांना ग्रामसभां मधून होणारा वाढता विरोध कायमचा बंद करण्यासाठी भाजप आघाडी सरकारने 1996च्या ग्रामपंचायत ग्रामसभा बैठक कायद्यात दुरुस्ती करून ग्रामसभांची मुस्काटदाबी करण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा आज काँग्रेस प्रवक्ते अॅड. यतीश नाईक यांनी दिला.
नाईक म्हणाले,नवीन कायदा दुरुस्ती नुसार भाजप आघाडी सरकारसाठी कळीचे ठरतील असे विषय ग्रामसभांमध्ये चर्चेस येऊच नयेत अशी तरतूद करण्यात आली असून लोकशाही साठी ते घातक आहे.विषय पत्रिकेवरील विषय सोडून कोणतेच विषय चर्चेस येऊ नयेत यासाठी सरकारची सुरु असलेली धडपड़ दुर्दैवी आहे.ग्रामसभां मध्ये गावाशी संबंधीत सगळे विषय चर्चेस यायला हवेत.त्यातून लोकशाही बळकट होते.त्यामुळे सरकारने ही दुरुस्ती मागे घ्यावी अन्यथा काँग्रेसला आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा नाईक यांनी यावेळी दिला. यावेळी प्रवक्ते सिद्धनाथ बुयाव आणि पणजी मंडळ अध्यक्ष प्रसाद आमोणकर उपस्थित होते.