गोसुमंच्या शिरोडकरांचा जाहिरनामा प्रसिद्ध

0
1019

मनोहर पर्रिकर हे पणजीचा विकस करण्यात 22 वर्षे अपयशी ठरले आहेत.जे ते 22 वर्षात करू शकले नाही ते 365 दिवसात करणार असे सांगून लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप गोवा सुरक्षा मंचचे पणजीचे उमेदवार आनंद शिरोडकर यांनी आज केला.
येथील टीबी कुन्हा सभागृहात शिरोडकर यांनी आज आपला जाहिरनामा प्रसिद्ध केला. पणजीला स्मार्ट करण्याच्या गोष्टी करत असले तरी पणजीचा बराच भाग बकाल अवस्थेत असून त्याला पर्रिकर जबाबदार असल्याचा आरोप शिरोडकर यांनी केला. शिरोडकर यांनी आपल्या जाहिरनाम्यात पणजीतील पार्किंग,कचरा, वाहतूक व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले आहे.