गोव्याला वाचविण्यासाठी पुढे सरसावलेल्या गोवेकरांना अरविंद केजरीवाल यांचा सलाम

0
268
गोव्यातील पर्यावरणविषयक आंदोलनांचे अरविंद केजरीवाल यांच्याकडून कौतुक  
गोवा खबर:आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या गोव्यातील जनतेचे कौतुक केले आहे.केजरीवाल यांनी लोकांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या गोवा सरकारचा निषेध केला आहे.

 केजरीवाल यांनी केलेल्या ट्विट मध्ये गोवा सरकार आंदोलने चिरडण्याचा आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे पण गोव्याच्या लोकांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्या सोडविण्याचा आंदोलन चिरडणे हा मार्ग नव्हे,असे स्पष्ट केले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना स्थानिक लोकांचा आवाज ऐका, असा सल्ला देताना केजरीवाल यांनी म्हटले आहे की गोव्याच्या लोकांचा आपल्या जमिनी व निसर्ग टिकवून ठेवण्यासाठीचा जो लढा आहे, त्यामध्ये आम आदमी पक्ष गोवेकरांच्या पाठीशी उभा आहे. आंदोलन करणाऱ्या लोकांबरोबर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आलेल्या आहेत, ज्यांना केजरीवाल यांनी विरोध केला आहे.