गोव्याला खास दर्जा मिळवून देणार,शिवसेना उमेदवार नाईक यांचे जाहीरनाम्यात आश्वासन

0
833
गोवा खबर:गोव्याला खास राज्याचा दर्जा,खाण व्यवसाय त्वरित सुरू करण्याचे आश्वासन,मांडवी मधून कॅसिनोची हकालपट्टी तसेच केंद्रातील नोकऱ्यांसाठी गोवेकारांना शंभर टक्के रखीवता असे गोव्याच्या हिताचे मुद्दे घेऊन शिवसेनेचा जाहीरनामा दक्षिण गोव्याच्या उमेदवार राखी प्रभुदेसाई नाईक यांनी प्रसिध्द केला आहे.
मडगावात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या दक्षिण गोवा उमेदवार राखी नाईक,अलेक्सि फर्नांडिस, फेलिक्स डायस, राजू विर्डीकर,माजी शिवसेना प्रमुख रमेश नाईक,वंदना लोबो ,धनंजय नाईक,रवींद्र तळावलीकर,सूर्यकांत नाईक व नंदकुमार नाईक उपस्थित होते.
राज्याचे विषय सोडवण्यात दोन्ही खासदर अपयशी ठरले आहेत. गोव्याला आता शिवसेना हाच पर्याय आहे असे  नाईक  यावेळी म्हणाल्या.
 खाण विषयात शिवसेना गल्ली पासुन दिल्ली पर्यन्त खाण अवलंबितांच्या बरोबर आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन खाण अवलंबितांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेना जिंकल्यास खाणी ताबडतोब सुरू केल्या जातील त्याच बरोबर खाण धोरण सुद्धा अवलंबले जाईल अशी माहिती नाईक यांनी दिली.
खाणीं सुरू करण्यासाठी विद्यमान खासदारांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले नसल्याचा आरोप नाईक यांनी केला .
शिवसेना निवडून आल्यास कॅसिनो हद्दपार केले जातील.कॅसिनो असलेल्या जहाजांना परवानगी दिली जाणार नाही .त्याच बरोबर सध्या कार्यरत असलेले कॅसिनो मांडवी मधून हवण्यासाठी तीन महिन्यांच्या अवधी त्यांना दिला जाईल असे त्या म्हणाल्या.
म्हादईप्रश्नी कठोर भूमिका घेतली जाईल.वास्को शहर कोळसा प्रदूषण मुक्त केला जाईल.एमपीटी मध्ये कोळसा साठवू देणार नाही.गोव्याला जेवढ्या कोळशाची आवश्यकता आहे तेवढाच कोळसा साठवण्याची परवानगी त्यांना दिली जाईल असे नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.
राखीव वनक्षेत्राचा सांभाळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.नैसर्गिक संपदा राखून ठेवण्याबरोबर,राखीव वनक्षेत्रात बेकायदेशीर कामांना थारा दिला जाणार नाही.वन क्षेत्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करण्यासाठीं न्यायालयीन आयोग स्थापन केला जाणार आहे अशी माहिती नाईक यांनी यावेळी सांगितले.
सीआरझेडची अधिसूचना पूर्ण पणे रद्द केली जाणार आहे .त्याचबरोबर पारंपरिक मच्छिमाऱ्यांना सरंक्षण दिले जाणार आहे.सर्व स्थानिक स्पोर्ट क्लबाना केंद्र सरकारचे आर्थिक सहाय्य पुरवले जाईल.तसेच सांगे भागात हॉस्टेल सुविधा निर्माण केली जाईल असे नाईक यांनी यावेळी सांगितले.
गोव्याला खास राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी शिवसेना काम करणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.
पत्रकरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना लोकांच्या भल्यासाठी शिवसेनेचे महाराष्ट्रात भाजपशी युती केली होती.गोव्यात सुद्धा तसा प्रस्ताव होता. पण गोव्यात युती होऊ शकली नाही.त्यामुळे गोव्यातील लोकांच्या समस्या केंद्राच्या माध्यमातून सोडविण्यासाठी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे नाईक यांनी सांगितले.