गोव्याला कृषी हब बनवण्याकामी सर्वतोपरी मदतीची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची तयारी

0
1057

वाणिज्य सचिवांकडून आज निर्यातदारांसाठीच्या बैठकीत राज्यातील स्थितीचा आढावा

 

गोवाखबर:केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या सचिव श्रीमती रीता तिओतिया यांनी आज निर्यातदारांच्या बैठकीत राज्यातील स्थितीचा आढावा घेतला. कृषी क्षेत्रासाठीचे मोठे केंद्र म्हणून राज्याच्या उदयासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची सर्वतोपरी मदतीची तयारी असल्याचं त्या म्हणाल्या. निर्यातदारांच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वाणिज्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय चढ्ढा, परकीय निर्यात संचालनालयाचे अपर महासंचालक निकूंज कुमार श्रीवास्तव, सागरी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष जयतिलक यांची उपस्थिती होती.

राज्यातील निर्यातदारांच्या जीएसटी परताव्याच्या समस्या, तसेच इतर समस्यांचेही निराकरण करण्यात बैठकीदरम्यान करण्यात आल्याचं वाणिज्य सचिवांनी सांगितलं. निर्यातीसाठी धोरण, सेवा, उत्पादनांची गुणवत्ता, यावरही बैठकीत चर्चा झाली. मंगळवारी वाणिज्य सचिव राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेणार आहेत. या भेटीत निर्यातीसंबंधीच्या धोरणावर चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीसाठी 100 पेक्षाही जास्त निर्यातदारांची उपस्थिती होती.