गोव्यात 230 जण कोविड मधून झाले बरे

0
563
गोवा खबर:गोव्यात आज कोविडचे 175 रुग्ण सापडले तर 230 जण बरे झाले.आतापर्यंत 4 हजार 861 रुग्ण सापडले असून त्यातील 3 हजार 277 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.अद्यापही 1 हजार 549 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत असून 35 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.आज न्यू वाडे वास्को येथील 63 वर्षीय इसम आणि झुवारी नगर येथील 53 वर्षीय इसमाचा कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
कोविडचे रुग्ण आणि मृतांची संख्या वाढत असल्याचे पडसाद उद्याच्या एक दिवसीय अधिवेशनात उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर गोव्यात आरोग्य केंद्र निहाय रुग्णांच्या आकडेवारीवर लक्ष टाकले तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळीत अजुनजही 73,आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपईत 10,म्हापशात 39,राजधानी पणजीत 46,कांदोळीत 22,कासारवर्णेत 19,कोलवाळेत 46,खोर्लीत 20,चिंबल मध्ये 42,शिवोलीत 14,पर्वरीत 19 रुग्ण उपचार घेत आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव मध्ये 103,वास्कोत 339,कुठ्ठाळीत 383,लोटलीत 27,धारबांदोडयात 46,फोंडयात 71 तर नावेलीत 23 रुग्ण आहेत.
रस्ता,रेल्वे आणि विमान मार्गे गोव्यात दाखल झालेले 94 जण कोविडग्रस्त आढळले आहेत.