गोव्यात 2 मार्च पासून किंग मोमोची राजवट

0
1230
गोवा खबर:गोव्यात 2 मार्चपासून कार्निव्हलला आरंभ होत आहे. खा, प्या व मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल उत्सव जोरात साजरा करावा असे आवाहन पर्यटन मंत्री बाबू  आजगावकर यांनी केले.  कार्निव्हलच्या थिम साँगचे उद्घाटन  झाले असून राजधानी पणजी कार्निव्हलच्या रंगात रंगून गेली आहे.शहरातील चौक,सर्कल कडे कार्निव्हलचे मुखवटे लावून त्यावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.देश विदेशातील हजारो पर्यटक दरवर्षी कार्निव्हलसाठी गोव्यात हजेरी लावतात…

 कार्निव्हल आयोजना बद्दल बोलताना पर्यटन मंत्री आजगावकर म्हणाले, गोव्याची पारंपरिक संस्कृती आम्हाला कार्निव्हलच्या माध्यमातून देश- विदेशात पोहचवायची आहे. यावेळी प्रथमच झांबीयाचे पर्यटन मंत्री व त्यांचे शिष्टमंडळ पणजीत होणाऱ्या कार्निव्हलला उपस्थित राहणार आहे. गोव्याची काजू फेणी, गोव्याची फिश करी, गोव्याच्या पूर्वजांनी सांभाळून ठेवलेल्या परंपरा या सगळ्य़ाचे दर्शन कार्निव्हलमधून जगासमोर मांडायचे आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च पर्यटन खाते करणार आहे.
  2 मार्चपासून तीन दिवस गोव्यात किंग मोमोची राजवट असेल. खा, प्या,मजा करा असा संदेश देत 2 मार्चला पणजीला  3 मार्चला मडगावमध्ये कार्निव्हलनिमित्ताने चित्ररथ मिरवणूक होईल. 4  मार्च रोजी फोंडा, कुडचडे व वास्कोत कार्निव्हलची मिरवणूक होईल तर 5 मार्च रोजी म्हापसा, शिरोडा व मोरजीत कार्निव्हल होईल.