गोव्यात होणारा 36 वा राष्ट्रीय क्रीडा महोत्सव कोविड – 19 महामारीमुळे पुढे ढकलला

0
255

गोवा खबर:गोव्यात 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान होणारा 36 वा राष्ट्रीय क्रीडा महोत्सव कोविड – 19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे.

36 व्या राष्ट्रीय क्रीडा महोत्सवासाठी पायाभूत सुविधांच्या बांधकाम आणि विकासासाठी केंद्र सरकारने गोवा सरकारला  97.80 कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

पहिला खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स ओडिशा येथे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 दरम्यान यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला होता. यामध्ये 17 क्रीडा प्रकारांसाठी 158 विद्यापीठांमधून एकूण 3182 स्पर्धकांनी सहभाग घेतला.

राज्य सरकार, संबंधित राष्ट्रीय क्रीडा संघटना, स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड इत्यादींच्या माध्यमातून खेळाडू आणि संघांना राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाविषयी माहिती आहे. राष्ट्रीय खेळांच्या तारखा निश्चित झाल्यावर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि राष्ट्रीय क्रीडा आयोजन समिती  राष्ट्रीय खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रित मध्यम, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया अशा विविध माध्यमातून प्रसिद्धी करते.

 

केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री (आयसी) किरेन रिजिजू यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.