गोव्यात सरकारी नारळ विक्रीला प्रचंड प्रतिसाद

0
862

गोवा:गोव्यातील नारळ उत्पादन घटल्याने बाजारपेठेत नारळाची आवक कमी झाली असून किंमती आकाशाला भिडल्या आहेत.बाजारात 30 ते 45 रुपये दराने मिळणारे नारळ परवडत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सुर व्यक्त होऊ लागला होता.त्याची दखल घेऊन सरकारने आज फलोत्पादन महामंडळामार्फ़त सवलतीच्या दरात नारळ विक्रिस सुरुवात केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पणजी येथे नारळ विकुन या योजनेचा शुभारंभ केला.
नारळाचे दर वाढुन देखील सरकार त्याची दखल घेत नसल्याने महिला काँग्रेसने स्वस्त नारळ विक्रीचे आंदोलन करून सरकारवर जोरदार टिका केली होती.महिला काँग्रेसच्या स्वस्त नारळ विक्री आंदोलना नंतर सरकारला स्वस्त नारळ विक्रीची योजना आणणे भाग पडले होते.आज पणजी आणि मडगाव येथे स्वस्त नारळ विक्रीस सुरुवात करण्यात आली.सरकारी नारळ विक्री 2 महीने चालणार असून आकारानुसार 15,18 आणि 20 रुपये दराने हे नारळ एलपीजी कार्ड धारकांना फलोत्पादन महामंडळांच्या केंद्रांवर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.