गोव्यात सकाळी दाटले दाट धुके

0
767
 गोवा:ओखीच्या तडाख्या नंतर 2 दिवसां पूर्वी ऐन हिवाळ्यात पावसाळा अनुभवलेल्या गोमंतकीयांनी आज सकाळी सगळा परिसर दाट धुक्यात गडप झाल्याचा अनुभव घेतला.100 मिटरच्या पलीकडचे काहीच दिसत नव्हते इतके दाट धुके आज पडले होते.सूर्य नारायणाचे दर्शन व्हायला त्यामुळे साडे नऊ वाजे पर्यंत प्रतीक्षा करावी लागली.सकाळी कामावर आणि मुलांना शाळेत सोडायला जणाऱ्यांना आपली वाहने हेडलाइट लावून चालवावी लागत होती.धुक्यामुळे एका वेगळ्याच प्रकारची झालर गोव्यावर आली होती.ओखीचा परिणाम कमी झाल्यापासून वातावरणातील गारवा वाढला आहे.विशेषता रात्रीच्या तापमानाचा पारा हळू हळू खाली जाऊ लागला आहे.वातावरणात काही बदल झाला नाही तर ख्रिसमस लोकांना गुलाबी थंडीत साजरा करण्याची संधी मिळणार आहे.