गोव्यात शिवसेना राबवणार शिव नेतृत्व अभियान

0
1098
 गोवा खबर:गोवा शिवसेनेतर्फे “शिव नेतृत्व अभियान”  मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. ही मोहीम सदस्यता नोंदणी मोहीम नसून नेतृत्व गुण अंगी असलेल्या सामान्य  गोंयकारांच्या हाती राजकीय नेतृत्व देण्याची मोहीम असल्याची माहिती गोवा राज्य प्रमुख जितेश कामत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ही मोहीम दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्पा ऑनलाईन’ पध्दतीने सोशल मीडियाद्वारे राबवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ” शिवसेना तुमच्या दारी” उपक्रमांद्वारे घरा घरात जाऊन ही मोहीम राबवण्याय येणार आहे, अशी माहिती कामत यांनी दिली.
 दुसरा टप्पा नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. ज्या सामान्य गोंयकार युवती कींवा युवकांना वाटते की त्यांच्या अंगी नेतृत्व गुण आहेत आणि समाज, गोवा, देशासाठी आपले योगदान द्यावे त्यांनी या मोहीमेत सहभागी होण्यासाठी ८६९६ २६२ २६२ या नंबरवर मिस्डकाॅल देण्याचे आवाहन कामत यांनी केले आहे. खास करून महीलांनी राजकारणाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गोव्यातील गढुळ झालेले राजकारण साफ करण्यासाठी सदर मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन कामत यांनी केले आहे.
 पक्षा पासून काही कारणास्तव फारकत घेतलेल्या माजी शिवसैनिकांनीही सर्व रुसवे फुगवे सोडून मोहीमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही मोहीम ६ महीने चालणार असून त्यानंतर प्रशिक्षण शिबीर संपन्न होणार आहे. शिबीरात तज्ज्ञांकडून पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाची शिस्त, प्रसिद्धी माध्यम व्यवस्थापन, वत्कृत्व कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे अशी अभियानाची रुपरेषा कामत यांच्याकडून जाहीर करण्यात आली.
गोवा राज्य शिवसेना गणेश चतुर्थी आरती संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी राज्य महासचिव मिलिंद गावस, राज्य सचिव  वंदना चव्हाण, मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो, राज्य कोष प्रमुख सुरज वेर्णेकर, उत्तर जिल्हा चिटणीस सुशांत पावसकर, उत्तर जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील, साखळी विभाग प्रमुख विश्राम परब आणि राज्य कार्यकारिणी सदस्य दामोदर वेरेकर प्रामुख्याने उपस्थित होते.