गोव्यात राज्यव्यापी कर्फ्यू 12 जुलै पर्यंत वाढवला

0
451
गोवा खबर:कोविड संकट अजून देखील कायम असल्याने सरकारने राज्यव्यापी कर्फ्यू 12 जुलै पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.आता पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत सुरु असणारी दुकाने आता सायंकाळी 6 वाजे पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.
यावेळी सलून बरोबर आउटडोअर स्पोर्ट्स कॉप्लेक्स आणि स्टेडियम देखील सुरु करता येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोशल मीडिया वरुन कळवल आहे.
 दरम्यान,गोव्यात आज कोविड मधून 285 जण बरे झाले.29 जणांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला.183 नवीन रुग्ण सापडल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 174 झाली आहे.दिवसभरात 2 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण कोविड बळीचा आकडा 3 हजार 62 झाला आहे.

गोव्यात येण्यासाठी आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक करण्यात आला असला तरी ज्यानी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना गोव्यात येण्यासाठी आरटीपीसीआर प्रमाणपत्राची गरज भासणार नाही.