गोव्यात येणाऱ्या कोविडग्रस्त पर्यटकांना बाबू आजगावकर जबाबदार: अमरनाथ पणजीकर 

0
827
गोवा खबर: गोव्यात येणाऱ्या कोविडग्रस्त पर्यटकांना पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर जबाबदार आहेत. आज कळंगुट येथे कोविडची लागण झालेला पर्यटक सापडल्याने कोविडची लागण झालेल्या पर्यटकांची वाढ होत असल्याचे उघड झाले आहे असे काॅंग्रेसचे सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यानी म्हटले आहे. 
गोव्यात हजारो पर्यटक बाबू आजगावकरांकडे सेटिंग करुन वास्तव्यास येत आहेत. पर्यटन मंत्र्यांच्या आशिर्वादाने बेकायदा चालु असलेल्या हाॅटेल्स व होम स्टे मध्ये ते राहतात. यातील अनेकांना कोरोना व कोविडची लागण झालेली असु शकते व हे लोक संपुर्ण गोव्याचा सर्वनाश करतील. आज बोगस पत्ता देऊन वास्तव्यास येणाऱ्या पर्यटकांना कोविड लागण झाल्याचे आढळल्यानंतर त्याना शोधण्यासाठी वैद्यकिय पथक व पोलीसांना नाहक त्रास सहन करावे लागतात. या सर्व प्रकाराला  बाबू आजगावकर जबाबदार आहेत,असा आरोप पणजीकर यांनी केला.
आपले मिशन ३० टक्के कमिशनचे धोरण राबवणारे  पर्यटन मंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर याना त्याचे कमिशन न मिळाल्यानेच त्यानी  कार्नीव्हल २०२०च्या अनेक बक्षिस विजेत्यांची रक्कम अडवून ठेवली आहे असा आरोप पणजीकर यानी केला आहे.
गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यानी त्वरीत याची दखल घ्यावी व मुख्यमंत्र्याना त्वरीत बक्षिसाची रक्कम सर्व विजेत्याना देण्याचे आदेश द्यावेत,अशी मागणी पणजीकर यांनी केली आहे.
गोव्यातील प्रतिभावान कलाकार स्वकष्टाने कार्नीव्हल  व शिगमो उत्सवात आपले कलात्मक चित्ररथ प्रदर्शित करतात. सदर चित्ररथ तयार करण्यासाठी त्याना भरपुर खर्च येतो. परंतु, पर्यटन मंत्री बाबू आजगावकरांच्या कमिशनच्या आशेमुळे या कला पथकांना हक्काची रक्कम अजुन मिळाली नाही हे दुर्देवी आहे,असे सांगून पणजीकर म्हणाले,आज बाबू आजगावकरांच्याच आशिर्वादाने गोव्यात पर्यटन विभागाकडे नोंदणी न झालेली अनेक बेकायदा हाॅटेल्स व होम स्टे चालु आहेत. आजगावकराना हप्ता देऊन हा धंदा ते चालवित आहेत. सद्य परिस्थीतीत अनेक पर्यटक बेकायदेशीरपणे अशा ठिकाणी निवास करुन आहेत व त्यांना कोरोनाची वा कोविडची लागण झाल्यास ते गोव्यात आता वाढत चाललेल्या कोविड संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरणार आहेत.
काॅंग्रेस पक्षाने अनेक वेळा पुराव्यासकट बाबू आजगावकरांचा भ्रष्टाचार उघड करुनही, केवळ मुख्यमंत्र्याचा आशीर्वाद असल्याने डाॅ. प्रमोद सावंत त्यावर कारवाई करीत नाहीत असा आरोप  पणजीकर यानी केला आहे.