गोव्यात मिस सुपर मॉडेल इंटरनेशनल स्पर्धा 2018चे आयोजन

0
2317

 

गोवा खबर:मिस सुपर मॉडेल इंटरनेशनल (एमएसएमआय), सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग स्पर्धा गोवामध्ये  आयोजित केली जाईल. पणजी येथे हॉटेल ऑरियन प्रीमियर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली.

प्रेस कॉन्फरन्सला विलियम जेव्हियर चित्रपट निर्माते व मुख्य कार्यकारी अधिकारी मिस सुपर मॉडेल इंटरनॅशनल,  भुवन सेठ – संचालक, जय भुवन ग्रुप व मॉल डी गोवा,  जना भंडारी – मुख्य कार्यकारी अधिकारी, मांडोवी मनोरंजन समूह,  आशा आरोंदेकर – तत्वा स्पाचे मालक आणि संजीव साल्वी, छायाचित्रकार उपस्तीत होते. 18 नोव्हेंबर 2018 रोजी मॉल डी गोवा येथे ग्रँड फिनाले आयोजित केली जाईल.

मिस सुपर मॉडेल इंटरनॅशनल केवळ मॉडेलिंग कारकीर्दीसाठीच नाही तर जगभरात नाव कमावण्यासाठी संधी आहे. मिस सुपर मॉडेल इंटरनलला विमल यांनी मॉल डी गोवा यांच्या सहकार्याने आणि आयएफडब्ल्यू गोवा (इंटरनॅशनल फॅशन वीक – गोवा) द्वारा समर्थित केले आहे.

मिस सुपर मॉडेल इंटरनॅशनल तरुण मुलींना त्यांचे मन आणि व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिभा दर्शविण्यासाठी प्रचंड संधी प्रदान करते. फॅशन, ग्लॅमर क्षेत्रात बेंचमार्क तयार करण्यासाठी भारतातील तरुण मॉडेलसाठी हा एक आदर्श मंच आहे. ही केवळ संधीच नव्हे तर उद्योगातील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि grooming देखील प्रदान करते.

एमएसएमआय  व्यवसायाच्या विविध क्षेत्रात व्यावसायिक बनवण्यासारखे आहे जसे की फिल्म मेकिंग, बिझिनेस कम्युनिटी, फॅशन डिझायनिंग, मीडिया, इव्हेंट्स, मार्केटिंग आणि अॅडव्हर्टायझिंग.

मिस सुपर मॉडेल इंटरनॅशनल – ही सौंदर्य स्पर्धा “बेटी बचाओ, बेटी पढाओ” मोहिमेला समर्थन देण्याच्या उद्देशाने समर्पित आहे. भारतातील 10 ऑडिशन केंद्रांमधून ऑडिशन प्रक्रियेद्वारे स्पर्धकांना गुणवत्तेच्या आधारावर निवडले गेले आहे. तेथे 20 स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रशिक्षण सत्रे 14 ते 17 नोव्हेंबर पर्यंत होणार आहे.

मिस सुपर मॉडेल इंटरनॅशनल (विजेता), मिस सुपर मॉडेल इंटरनॅशनल (पहिला रनर अप), मिस सुपर मॉडेल इंटरनॅशनल (2 रा रनर अप), मिस ब्युटीफूल, मिस स्माइल, मिस कॉन्फिडेंट, मिस फ्रेश फेस, मिस टॅलेंट आणि मिस फोटोजेनिक ही विविध शीर्षके विजेत्यांना दिली जातील.

स्पर्धेच्या विजेतीला ‘मिस सुपर मॉडेल इंटरनॅशनल’ शीर्षक देण्यात येणार आहे आणि तिला वेगवेगळ्या देशांतील अनेक आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमधे भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल. विजेतीला चित्रपट, टीव्हीसी व brand endorsements पण करण्याची संधी मिळेल.