गोव्यात बैसाखी उत्साहात साजरी

0
999
गोवाखबर:गोव्यातील शिख बांधवांनी धार्मिक परंपरे नुसार बैसाखी उत्सव साजरा करण्यात आला.बेती येथील गुरुद्वारामध्ये बैसाखी निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बैसाखीचे औचित्य साधून पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग यांचा गुरुद्वारा समिती आणि शिख बांधवांतर्फे सत्कार करण्यात आला. गुरुद्वाराचे साहिबचे अध्यक्ष  हरविंदर सिंग आणि अमरजीत चावला यांच्या प्रमुख उपस्थितीत जसपाल सिंग यांचा सत्कार करण्यात आला.
बैसाखी निमित्त राज्यपालांनी शिख बांधवांना शुभेच्छा दिल्या होत्या. काही हॉटेल्स मध्ये बैसाखी निमित्त विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.