गोव्यात फक्त तिनच वाघ!

0
827
गोवा खबर: नव्या व्याघ्र गणनेप्रमाणे गोव्याच्या जंगल क्षेत्रात फक्त तीन वाघ आहेत. मागच्या वेळेच्या व्याघ्र गणनेत गोव्यातील जंगलात पाच वाघ असल्याचे म्हटले होते. २०१८ मध्ये झालेल्या व्याघ्र गणनेत ही संख्या तीन वर आली आहे.
पश्चिम घाटाच्या रांगेत येणाऱ्या कर्नाटक राज्यात वाघांची संख्या प्रचंड वाढली आहे. २०१४ च्या व्याघ्र गणनेत कर्नाटकात असलेल्याच ४०६ वाघावरून ही संख्या आता ५२४ झाली आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यातील वाघांची संख्या ७७० वरून ९८१ झाली आहे.
आज जाहीर केलेल्या व्याघ्र गणनेत देशात २९६७ वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील अहवाल सोमवारी दिल्ली येथून प्रसिद्ध करण्यात आला.