गोव्यात पाच ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा

0
999
‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, हे श्रीगुरूंचेच कार्य ! – वैभव आफळे  
 गोवा खबर: भारत स्वतंत्र झाला; मात्र न्याययंत्रणा, शिक्षणव्यवस्था, राज्यव्यवस्था इत्यादी सर्वच गोष्टी आपण इंग्रजांकडून आहे तशा स्वीकारल्याने आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळालेच नाही. एकीकडे देश ‘सेक्युलर’ आहे, असे म्हणायचे आणि सर्व सुविधा मात्र अल्पसंख्यांकांना द्यायच्या, अशी आजची स्थिती आहे. या देशातील हिंदूंना सातत्याने दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे हिंदूंना पुन्हा एकदा सन्मानाने जगण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण प्रत्येकाने धर्मशिक्षण घेऊन, धर्माचरण करून हिंदु राष्ट्रासाठी यथाशक्ती योगदान दिले पाहिजे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण सर्वजण यासाठी कटिबद्ध होऊया. धर्माधिष्ठित ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना करणे, हे काळानुसार श्रीगुरूंचेच कार्य आहे, असे प्रतिपादन सनातनचे साधक  वैभव आफळे यांनी केले.
सनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते. हा महोत्सव २७ जुलै या दिवशी सायंकाळी श्री महालक्ष्मी देवस्थान सभागृह, पणजी येथे साजरा झाला. तसेच देशभरात १०९ ठिकाणी, तर गोव्यात एकूण पाच ठिकाणी असे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरे झाले.
पणजी येथील कार्यक्रमाला शिवोली येथील वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुरज चोडणकर यांचेही मागदर्शन लाभले. मुख्याध्यापक  चोडणकर मार्गदर्शनात म्हणाले,‘‘ ८४ लक्ष योनीचा प्रवास केल्यानंतर मानव जन्म मिळतो. मानव जन्माचे सार्थक करण्यासाठी मनापासून आणि नम्रतेने सेवा करून गुरुकृपा संपादन केली पाहिजे.’’ महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या वेळी आपत्काळात समाजसाहाय्यासाठी आवश्यक ‘प्रथमोपचार प्रात्यक्षिके’ आणि बचाव अन् आक्रमण शिकवणारी ‘स्वसंरक्षण प्रात्यक्षिके’ दाखवण्यात आली.
१३ भाषांत ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमातून ४० सहस्र जिज्ञासूंनी घेतला ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ
यंदाच्या वर्षी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, हिंदी, कन्नड, तामिळी, तेलगु, मल्याळी, गुजराती, बंगाली, उडिया, आसामी, गुरुमुखी या भारतीय भाषांत, तसेच इंग्रजी आणि नेपाळी या विदेशी भाषांतही ‘फेसबुक लाइव्ह’च्या माध्यमांतून गुरुपौर्णिमा महोत्सवांचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या माध्यमांतून देश-विदेशांतील४० सहस्र जिज्ञासूंनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.