गोव्यात न्यूड पार्टीचे आयोजन ?

0
1074
गोवा खबर:प्रायव्हेट गोवा पार्टी..अनलिमिटेड सेक्स  स्टाइल एंड क्लास वुइथ लक्झरी एंड कन्फर्ट …अशा आशयाच्या एका जाहिरातीने सध्या गोव्यात धुमाकुळ घातला आहे.खरच अशा प्रकारची पार्टी गोव्यात होऊ शकते का या बद्दल उलट सुलट चर्चा सध्या रंगात आली आहे.
सोशल मीडियावर जाहिरात वाऱ्याच्या वेगाने फिरू लागली आहे.जाहिराती मध्ये उत्तर गोव्यातील मोरजी येथील दोन रस्त्यांचा उल्लेख असून एका व्यक्तीचा फोन नंबर देखील देण्यात आला आहे.जाहिराती मध्ये न्यू कलेक्शनच्या नावे 10 ते 12 नग्न विदेशी युवती एकमेकांसोबत झोपल्याचा फोटो असून त्यात त्या युवतींचे चेहरे देखील दाखवण्यात आले आहेत.
त्या फोटो खाली,हाय डियर सर,वुई ऑर्गनाइज प्रायव्हेट पार्टी इन गोवा,देअर इज 15 टू 20 फॉरिनर्स गर्ल्स,10+ इंडियन्स असे वर्णन करण्यात आले आहे.म्हणजे 15 ते 20 विदेशी युवती आणि 10 हुन अधिक भारतीय युवती या पार्टीचे आकर्षण असणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
पार्टी बद्दल अधिक माहिती देताना अनलिमिटेड सेक्स अनलिमिटेड गर्ल्स अनलिमिटेड लिकर एंड फूड अर्थात खा, प्या आणि मजा करा अशी व्यवस्था पार्टी मध्ये करण्यात आली असल्याचे सांगत सगळ्यांचे लक्ष वेधुन घेण्यात ही जाहिरात यशस्वी ठरली आहे.
पार्टी मध्ये बॅले डान्स असणार असून त्याखेरीज डे यॉट न्यूड फन पार्टी,प्रायव्हेट आइलैंड सेक्स पार्टी,लाइव डीजे,मुजरा, न्यूड गर्ल डान्स आणि न्यूड पूल पार्टी,अनलिमिटेड फन असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
पार्टी नेमकी कुठे,किती वाजता  आणि कोणत्या तारखेला होणार याचा उल्लेख नसला तरी मोरजी-आश्वे रस्ता आणि गावडेवाडा रस्ता मोरजी अशा दोन रस्त्यांचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.
सोशल मीडिया वर ही जाहिरात व्हायरल होऊ लागताच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून पोलिसांच्या क्राइम ब्रांच तर्फे अशी पार्टी खरोखरच होणार आहे का याचा तपास आता सुरु झाला आहे.
न्यूड पार्टीच्या सुत्रधाराचे धागेदोरे सापडले:मुख्यमंत्री
उत्तर गोव्यात मोरजी येथे न्यूड पार्टी आयोजित केल्याची जाहिरात करून गोव्यात खळबळ उडवून देणाऱ्या सूत्रधाराचे धागेदोरे शोधून काढण्यात पोलिसांना यश आले असून लवकरच त्याच्या मुसक्या आवळल्या जातील,अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले,न्यूड पार्टीची जाहिरात व्हायरल झाल्या नंतर सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे.ती जाहिरात डीजीपींकडे पाठवून सखोल तपास करण्यास सांगितले आहे.
त्या जाहिराती मधील मज़कूरात गोव्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात त्याचा गोव्याशी काही संबध नाही.कोणी तरी गोव्याच्या पर्यटनाला बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला असावा,अशी शक्यता वर्तवून मुख्यमंत्री म्हणाले,जाहिराती वरील फोन नंबर वरुन दिल्ली येथील सूत्रधारा पर्यंत पोलिस लवकरच पोचतील आणि त्याच्या मुसक्या आवळतील. पोलिसांना महत्वाचे धागेदोरे सापडले आहेत.