गोव्यात दिवसभरात विक्रमी14 जणांचा कोविडने मृत्यू

0
432
गोवा खबर:गोव्यात कोविडचे संकट गंभीर बनत चालले आहे.आज दिवसभरात कोविडने 26 वर्षाच्या युवकासह 14 जणांचा कोविडने मृत्यू झाल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गोव्यात आज नव्याने 306 रुग्ण सापडले.519 जण बरे होऊन घरी गेले असले तरी 14 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तीनशेच्या पार 304 वर पोचल्याने कोविड संकट आणखी गंभीर झाले आहे.
गोव्यात आतापर्यंत 24 हजार 898 कोविडग्रस्त सापडले असून त्यातील 19 हजार 648 बरे झाले आहेत.आजचे 306 रुग्ण मिळून 4 हजार 946 कोविड रुग्ण ठीकठीकाणी उपचार घेत आहेत.
उत्तर गोव्यात साखळी,डिचोली,वाळपई, पणजी,पर्वरी येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत.
दक्षिण गोव्यात सर्वाधिक रुग्ण मडगाव मध्ये 418 झाले आहेत.त्याशिवाय वास्को,फोंडा आणि कुठ्ठाळी येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत.
सांताक्रुझचे भाजप आमदार टोनी फर्नांडिस आणि मांद्रेचे भाजप आमदार दयानंद सोपटे यांना देखील कोविडची लागण झाली आहे.टोनी मणिपाल या खाजगी हॉस्पिटल मध्ये तर सोपटे होम आइसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.
  • दरम्यान,कोविडची लक्षणे दिसताच आपली चाचणी करून घेऊन वेळीच उपचार घ्या,असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.कोविडने दिवस भरात 14 जणांचा मृत्यू झाल्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सावंत यांनी हे आवाहन केले आहे.काही जण लक्षण दिसत असताना वेळेत उपचार घेत नसल्याने मृतांचा आकडा वाढू लागला आहे.कोविड संकटावर मात करून मृतांचा आकडा कमी करण्यासाठी सगळ्यानी सहकार्य करावे,असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले आहे.