गोव्यात दिवसभरात कोविडचे 508 रुग्ण,8 जणांचा मृत्यू

0
790
 गोवा खबर:गोव्यात कोविड बळींचा आकडा 220 वर गेल्यामुळे कोविड संकट गडद झाले आहे. कोविडने आज दिवसभरात आणखी 8 बळी घेतले. दिवसभरात 508 रुग्णांची भर पडली असून ३८६ जण बरे होऊन घरी गेले आहेत. हॉस्पिटल्स फूल झाली असल्याने  270 जणांनी घरी अलगीकरणाचा पर्याय निवडला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 896 वर गेली असून दिवस भरात गेलेले 8 बळी मिळून मृतांचा आकडा  220 वर गेला आहे.
सर्व सामान्य लोकां बरोबर केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह काही आमदार देखील कोविडग्रस्त झाले असून गणेश चतुर्थी नंतर रुग्णांचा आकडा वेगाने वाढू लगल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
गोव्यात आता पर्यंत 19 हजार 863 रुग्ण सापडले असून त्यातील 4 हजार 896 सक्रिय आहेत.14 हजार 747 रुग्ण बरे होऊन घरी गेले असले तरी  मृतांच्या आकडयाने द्विशतक गाठून 220 पर्यंत मजल मारली आहे.
आरोग्य खात्याने आरोग्यकेंद्र निहाय दिलेल्या बुलेटिन नुसार उत्तर गोव्यात साखळीत 269,पेडणेत 211,वाळपईत 153,म्हापशात 218,पणजीत 243,पर्वरीत 275 रुग्ण आहेत.
दक्षिण गोव्यात सर्वाधिक रुग्ण सध्या मडगाव मध्ये 446 आहेत.त्याशिवाय वास्कोत 271,कुठ्ठाळीत 118 आणि केपेत 114 रुग्ण आहेत.
उत्तर गोव्यात कोविड केअर सेंटर मध्ये 545 बेडची व्यवस्था असून तेथे 158 बेड अजुन शिल्लक आहेत तर दक्षिण गोव्यात 1 हजार 6 बेडची व्यवस्था असून तेथे 246 बेड उपलब्ध असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे.