गोव्यात तीन दिवसांच्या लॉक डाउनला सुरुवात

0
657
गोवा खबर:राज्यात कोविड रुग्णांची आणि मृतांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकारने जाहिर केलेल्या तीन दिवसांच्या लॉक डाउनला आज पासून सुरुवात झाली.जीवनावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळत आहे.
दूध,मेडिकल,किराणा दुकाने, बँका,एटीएम,पेट्रोल पंप आणि खाजगी टॅक्सी सेवा सुरु आहे.ठीकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली असून विनाकारण कोणी बाहेर फिरु नये याची खबरदारी घेतली जात आहे.
राजधानी पणजी मधील मनपा मार्केट, फिश,मटण मार्केट तीन दिवस बंद राहणार आहे.पणजी मनपातर्फे सफाई आणि कचरा उचलीची काम आज आणि उद्या सुरु असणार आहेत.मात्र रविवारी कचरा उचल होणार नाही. एक दिवस मनपा कामगार सुट्टी सोमवारी कचरा उचल करणार असल्याचे महापौर उदय मडकईकर यांनी स्पष्ट केले आहे.