गोव्यात ‘जॅनरीक’ औषध विक्री केंद्रे उभारा’

0
1122
 गोव्यातील महत्त्वाची रुग्णालये, शहरे आणि नगरे या ठिकाणी ‘जॅनरीक’ औषध विक्री केंद्रे उभारण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने १५ ऑगस्ट या दिवशी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे अध्यक्ष      चंद्रकांत (भाई) पंडित, हिंदु जनजागृती समितीचे जयेश  थळी आदींचा प्रमुख सहभाग होता.
या निवेदनात  समाजातील प्रत्येक क्षेत्र भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आदी समस्यांनी ग्रासलेले आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी एक चळवळ हाती घेतली आहे. या अंतर्गत समितीने ‘जॅनरीक’ औषध विक्री केंद्रे उभारण्याची मागणी केली आहे. आज बाजारात ‘ब्रेंडेड’ कंपनीची (जॅनरीक) औषधे प्रचलीत ‘ब्रँड’ नसलेल्या कंपनीच्या समजॅनरीक औषधापेक्षा बर्‍याच वाढीव दराने विकली जातात. समाजातील गरीब लोकांना ही महागडी औषधे घेणे परवडत नाही आणि यामुळे अल्प किमतीत दर्जात्मक ‘जॅनरीक’ औषध विक्री केंद्रे उभारणे काळाची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे ही मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्रातील रसायन आणि खत मंत्रालयाच्या औषधालय खात्याने ‘प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना’ कार्यान्वित केली आहे. तसेच ‘फार्मा सल्लागार मंडळा’च्या २३ एप्रिल २००८ रोजी झालेल्या बैठकीत देशातील विविध जिल्ह्यांमध्ये ‘जन औषधी परियोजना’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता; मात्र अजूनपर्यंत गोव्यात अशी औषध विक्री केंद्रे स्थापन करण्यात आलेली नाहीत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय जरी रुग्णांना मोफत औषधे पुरवत असली, तरीही अनेक औषधे रुग्णांना विकत घ्यावी लागत आहेत