गोव्यात घूमणार ओस्सयSS ओस्सयSSचा गजर

0
960

गोवाखबर: कार्निव्हलचे जोरदार साजरीकरण झाल्यानंतर गोव्यामध्ये आता शिगमो या रंगांच्या, वेशभूषेच्या व संस्कृतीच्या महोत्सवाचे स्वागत करण्याची तयारी सुरू आहे!
गोव्यात सगळीकडे 3 मार्च ते 17 मार्च 2018 या कालावधीमध्ये दोन आठवड्यांचा महोत्सव साजरा होणार आहे. गोवा पर्यटनाने दोन आठवड्यांच्या महोत्सवासाठी ग्रामीण व शहरी अशा दोन्हींकडे विविध ठिकाणी शिगमोची तयारी केली आहे आणि स्थानिकांना व पर्यटकांना या महोत्सवाच्या धार्मिक व सांस्कृतिक पैलूंचा आनंद घेण्याची व त्यामध्ये सहभागी होण्याची संधी निर्माण केली आहे.
भव्य दिंडीमध्ये अथकपणे नृत्य करणारे पुरुष व स्त्रिया यांमुळे सर्वांना शिगमो परेडमध्ये गोव्यातील जीवनाची झलक पाहायला मिळणार आहे. शिगमो हा गोव्यातील सर्वात मोठा हिंदू सण असून त्यामध्ये दरवर्षी राज्यभर दिंड्या व महोत्सवाचे वातावरण असते. या वर्षी, शिगमोत्सवाचे स्वरूप नक्कीच भव्य व उत्तम असणार आहे.
पारंपरिक लोकनृत्य व पुराणकालीन दृष्ये हे यंदाच्या परेडचे आकर्षण असेल.
शिगमोत्सवादरम्यान, शहरांतून काढल्या जाणाऱ्या दिंड्यांमध्ये गोव्यातील मंडळी रंगीत कपडे परिधान करतात, विविध रंगांचे झेंडे हाती घेतात आणि ढोलताशासारखी निरनिराळी वाद्ये वाजवतात. रस्त्यांवरून जाणाऱ्या परेडमधल्या फ्लोटमध्ये अतिशय आकर्षक साजरीकरण सुरू असते.
घोडे मोडणी व फुगडी अशी लोकनृत्ये रस्त्यावर मोठ्या गटाने केली जातात. त्यातून गोव्याची संस्कृती दर्शवली जाते.
लोक फॅन्सी ड्रेस स्पर्धांमध्येही भाग घेतात आणि पुराणातल्या व्यक्तींसारखे व देवांसारखे कपडे घालून सहभागी होतात.
गोव्यात सर्वत्र सजावट करण्यात  आल्याने अगोदरच सगळीकडे रंगबिरंगी वातावरण दिसत आहे.
शिगमो फ्लोट परेडचे वेळापत्रक :
03/03/2018 Ponda
04/03/2018 Margao
06/03/2018 Sanguem
07/03/2018 Vasco & Sanquelim
08/03/2018 Valpoi
09/03/2018 Bicholim
10/03/2018 Panjim
11/03/2018 Mapusa
12/03/2018 Pernem
13/03/2018 Canacona
14/03/2018 Quepem,
15/03/2018 Curchorem
16/03/2018 Cuncolim
17/03/2018 Dharbandora