गोव्यात ख्रिस्ती बांधवांनी गुड़ फ्रायडे निमित्त केले येशूचे स्मरण

0
1137

गोवा:येशूला क्रॉसवर लटकवलेला दिवस म्हणून आज गोव्यातील ख्रिश्चन बांधवांनी आज गुड़ फ्रायडेच्या निमित्ताने येशू आणि त्याच्या शिकवणीचे स्मरण केले. गुड़ फ्रायडे निमित्त राज्यभरातील चर्च मध्ये प्रार्थना सभा पार पडल्या.या प्रार्थना सभां नंतर येशूची प्रतिमा क्रॉस वरुन उतरवून त्याची मिरवणूक काढण्यात आली.येशूची प्रतिमा क्रॉस वरुन उतरवून त्याची मिरवणूक काढण्याचा सोहळा गांभिर्याने आणि धार्मिक वातावरणात पार पडला. प्रार्थना सभा आणि मिरवणूकीत हजारो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते.