गोव्यात कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी जनतेला खबरदारी घेण्याचे सरकारचे आवाहन

0
585

गोवा खबर:गोव्यात कोविड -19 चा संसर्ग रोखण्यासाठी गोवा सरकारने विविध प्रकारच्या  उपाययोजनांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना बाधित रुग्ण गोव्यात दाखल होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला गोव्यामधून प्रवास करणार्‍या रेल्वें गाड्यांना गोव्यातील स्टेशनवर थांबवू नये आणि गोव्यामध्ये येणार्‍या सर्व रेल्वेंना तात्पुरत्या काळासाठी निलंबित कराव्या, कारण ज्या दोन राज्यांमध्ये कोरोना व्हायरस 19 चे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहे त्या दोन्ही राज्यांच्या सीमा गोवा प्रदेशाला भिडलेल्या आहेत.

आरोग्य संचालनायाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनांमध्ये कामकाजांच्या वेळा नियंत्रित करण्याचा सल्लाजारी केला आहे. आणि औद्योगिक आस्थापनांनादेखील आपल्या कामाच्या वेळा कमी कराव्यात, त्याचप्रमाणे स्थानिक बाजारांमधील गर्दी नियंत्रित करण्याचाही सल्ला दिलेला आहे.

खाजगी क्षेत्रांनी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या कर्मचाऱ्यांनी घरी राहून कामकाज करावे जेणेकरुन अनावश्यक गर्दी टाळता येईल.

खेळाचे कार्यक्रम, स्पर्धा आणि धार्मिक मेळावे इत्यादींचे आयोजन पुढे ढकलण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.

छोट्या स्वरुपाचे स्नेह मेळाव्यांमध्ये सहभाग घेतल्यास सुरक्षित अंतर राखावे असेही सरकारने म्हटले आहे.त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी (लोकप्रतिनिधी वगळता) अत्यावश्यक वैद्यकीय गरज नसल्यास कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरीच राहावे.

दहा वर्षांखालील मुलांनी घरीच राहावे, तसेच सार्वजनिक स्थळे, पार्क, सहली, खेळ इत्यादीमध्ये जावू नये.

सर्व आरोग्य आस्थापनांनी, इस्पितळांनी अत्यावश्यक नसलेल्या सर्जरी, तसेच तातडीची नसलेली रूग्ण भरती टाळावी.

युवा वर्गाने सरकारच्या उपाययोजनांना सहकार्य देताना कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी सहाय्य करावे.

सरकारी खात्यांच्या सर्व प्रमुखांना आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना आवश्यकता नसल्यास घरी राहून काम करण्याची मूभा देण्याचे अधिकार सरकारतर्फे देण्यात आले आहेत. जेणेकरुन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाईल, अन् कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.

कोविड-19 संदर्भात जनतेला माहिती देण्यासाठी तसेच मदत पुरविण्यासाठी 104 हेल्पलाईन सुरु केली असून, जे लोक परदेशांतून किंवा बाहेर राज्यांतून प्रवास करुन आले असल्यास त्यांच्याविषयी माहिती या हेल्पलाईना द्यावी अशी विनंती सरकारने जनतेला केली आहे.

ज्या नागरीकांना कोविड-19 च्या संसर्ग झाल्याची लक्षणे आढळून आली असल्यास त्यांनी त्वरीत स्वतःची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे.

जे लोक गोव्यात येण्याचे नियोजन करीत आहेत, त्यांनी सद्य परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत गोव्यात दाखल होवू नये.

जनता कर्फ्यू (संचारबंदी) -22 मार्च 2020

जनता कर्फ्यू (संचारबंदी) रविवारी, 22 मार्च 2020 या दिवशी सकाळी 7.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत कर्तव्यदक्षपणे पाळण्यात येईल. गोवा दुसर्‍या टप्प्यांमध्ये आहे आणि तिसर्‍या टप्प्यात जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. या टप्यापासून बचाव करण्यासाठी लोकांनी रात्री 22 मार्च रोजी  रात्री 9.00 वाजल्यानंतरही घराबाहेर पडू नये तसेच  सोमवारी सकाळी घरा बाहेर  असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

घरातून बाहेर पडण्यास शक्यतो टाळावे, जर अत्यावश्यक कार्य असल्यास तरच घराबाहेर पडावे.

जे इतरांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत, शिष्टाचार म्हणून कृपया त्यांच्यासाठी संध्याकाळी 5 वाजता 5 मिनिटेपर्यंत टाळ्या वाजवाव्यात.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

 

अद्याप गोव्यात कोव्हीड-19 चा एकही रूग्ण आढळला नसला तरीही देशामध्ये कोविड-१९ चे रूग्ण आढळले आहे. त्यासाठी आपण आवश्यक ती दक्षता घेतली पाहिजे आणि या व्हायरसपासून समुदायांना संक्रमित होण्यापासून आवश्यक ते सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळाव्या लागेल.

भारत सरकारने जारी केलेले विविध नियम, सल्ले आणि उर्वरित राज्यांमधील परिस्थिती पाहता राज्य सरकारने जन हिताच्या आरोग्याच्या दृष्टीने खालील निर्णय घेतले आहे.

 1. आज मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधून येणार्‍या सर्व प्रकारच्या प्रवांसी वाहनांना आळा घालण्यासाठी गोव्याच्या सीमेवर त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली जाईल.
 2. खेळाचे कार्यक्रम, स्पर्धा आणि धार्मिक मेळावे इत्यादींचे आयोजन  31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्याचा सल्ला सरकारने दिला आहे.
 3. भाड्याने कॅब, टॅक्सी, मोटारसायकल यांचा वापर करणे हे 31 मार्चपर्यंत निलबिंत केले आहे.
 4. कोव्हीड-19 याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आर.टी. ओ च्या कार्यालयात 31 मार्चपर्यंत 2020 पर्यंत किमान नागरिकांना सेवा दिली जाईल. सर्व कार्यालयातील इनवर्ड काऊंटर आणि फक्त बीएस-आयव्ही वाहनांच्या नोंदणीसाठी नोंदणी काऊंटर उपलब्ध राहील.अन्य सेवा जसे वाहतूक परवाना, वाहतुकांची नोंदणी, परवाना यांची 31 मार्च 2020 पर्यंत प्रक्रिया केली जाणार नाही.
 5. वाहतूक खात्यातर्फे रस्ता मार्गावरील कदंब आणि इतर सार्वजनिक परिवहन सेवा किमान स्तरावर ठेवल्या जातील.
 6. सरकारी खात्यांच्या सर्व प्रमुखांना आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांना आवश्यकता नसल्यास घरी राहून काम करण्याची मूभा देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. जेणेकरुन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाईल, अन् कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.
 7. रस्त्यावरील सर्व खाद्यपदार्थांची दालने 31 मार्च 2020 पर्यंत बंद असतील.
 8. ग्रंथालये, संग्रहालये या सारख्या सार्वजनिक असणार्‍या अनावश्यक सुविधा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येईल.
 9. सॅनिटायझर्सचा कमतरतेवर मात करण्यासाठी डिस्टिलरींचा उपयोग करण्यासाठीची परवानगी दिली जाईल.
 10. आरोग्य संचालनायाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापनांमध्ये कामकाजांच्या वेळा नियंत्रित करण्याचा सल्ला जारी केला आहे. आणि औद्योगिक आस्थापनांना देखील आपल्या कामाच्या वेळा कमी कराव्यात, त्याचप्रमाणे स्थानिक बाजारांमधील गर्दी नियंत्रित करण्याचाही सल्ला दिलेला आहे.
 11. खाजगी क्षेत्रांनी ज्या ठिकाणी शक्य असेल त्या कर्मचाऱ्यांनी घरी राहून कामकाज करावे जेणेकरुन अनाव्यश्यक गर्दी टाळता येईल.
 12. छोट्या स्वरुपाचे स्नेह मेळाव्यांमध्ये सहभाग घेतल्यास सुरक्षित अंतर राखावे असेही सरकारने म्हटले आहे.
 13. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी (लोकप्रतिनिधी वगळता) अत्यावश्यक वैद्यकीय गरज नसल्यास कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरीच राहावे.
 14. दहा वर्षांखालील मुलांनी घरीच राहावे, तसेच सार्वजनिक स्थळे, पार्क, सहली, खेळ इत्यादीमध्ये जावू नये.
 15. सर्व आरोग्य आस्थापनांनी, इस्पितळांनी अत्यावश्यक नसलेल्या सर्जरी, तसेच तातडीची नसलेली रूग्ण भरती टाळावी.
 16. लोकांना अशी विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कोणत्याही बाबतीत घाबरूनये आणि अफवापासून दुर रहावे.
 17. कर्मचार्‍यांना वेतन पगार कापू नये अशी विनंती करण्यात येते.
 18. कोविड-19 संदर्भात जनतेला माहिती देण्यासाठी तसेच मदत पुरविण्यासाठी 104 हेल्पलाईन सुरु केली असून, जे लोक परदेशांतून किंवा बाहेर राज्यांतून प्रवास करुन आले असल्यास त्यांच्याविषयी माहिती या हेल्पलाईना द्यावी अशी विनंती सरकारने जनतेला केली आहे.
 19. ज्या नागरीकांना कोविड-19 च्या संसर्ग झाल्याची लक्षणे आढळून आली असल्यास त्यांनी त्वरीत स्वतःची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे.
 20. जे लोक गोव्यात येण्याचे नियोजन करीत आहेत, त्यांनी सद्य परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत गोव्यात दाखल होवू नये.
 21. खात्यातर्फे सर्व शैक्षणिक संस्थातील शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी यांना शाळा, कॉलेजमध्ये इत्यादींमध्ये उपस्थित न राहण्याची मुभा दिलेली आहे अशी सूचना जारी केली आहे.
 22. रस्त्यावर मिळणारे खाद्यपदार्थ हे 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहणार अशी आवश्यकसूचना म्युनसिपल प्रशासनाचे संचालक आणि पंचायत खात्याचे संचालकांनी जाहिर करण्याबाबत निर्देशित केले आहे.
 23. राज्य प्रबंधकांनी उप प्रबंधकाला निर्देशित करावे की 31 मार्चपर्यंत लग्न, दस्ताऐवज, डीड यांची नोंदणी करू नये.
 24. या व्यतिरिक्त, संबंधित खात्याचे खाते प्रमुखांनी  कोव्हीड-19 च्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना जारी कराव्या आणि त्यांच्या कार्यवाही बद्यल मिडीया आणि लोकांशी संवाद साधावा.
 25. त्याचप्रमाणे जी सरकारी खाती परवाना जारी अथवा नूतनीकरण  किंवा मान्यता देण्याशी संबंधित आहेत्यांनी ही सेवा 31 मार्चपर्यंत 2020 बंद ठेवावी जेणेकरून लोकांच्या जमावास आळा बसेल.
 26. युवा वर्गाने सरकारच्या उपाययोजनांना सहकार्य देताना कोविड-19 चा मुकाबला करण्यासाठी सहाय्य करावे.