गोव्यात किंग मोमोची राजवट सुरु!

0
1203
गोवा खबर:गोव्यात आजपासून किंग मोमोच्या राजवटी सुरु झाली.राजधानी पणजी येथे हजारो देशी आणि विदेशी पर्यटकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्निव्हल मिरवणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी यांची वेशभूषा केलेले कलाकार सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र बनले होते.

कार्निव्हल मिरवणूकीत व्यक्तिगत पातळीवर वेशभूषा करून सहभागी होता येते.सध्या चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेशभूषा केलेल्या कलाकाराने सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतले.या हुबेहुब वाटणाऱ्या मोदीं सोबत सेल्फी काढून घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत होते.मध्येच मोदी यांना महात्मा गांधी भेटले.दोघांनी एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवले.तेव्हा देखील सगळ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले.
आज पणजी येथील कार्निव्हल मिरवणूकीत 60 हुन अधिक चित्ररथ सहभागी झाले होते.मिरवणूक बघण्यासाठी देश विदेशातील हजारो पर्यटक मीरामार ते दोनापावल रसत्यावर जमले होते.गोव्याची संस्कृती दाखवणारे चित्ररथ आणि त्यासोबत नृत्य करणारी पथके डोळ्यांचे पारणे फेडणारी होती.