गोव्यात किंग मोमोची राजवट सुरु

0
462
गोवा खबर:खा, प्या,मजा कराचा संदेश देणाऱ्या किंग मोमोची राजवट आज पासून गोव्यात सुरु झाली आहे.राजधानी पणजी येथे पार पडलेल्या कार्निव्हल मिरवणूकीत किंग मोमोने आज त्याची घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून कार्निव्हल मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली.उद्धाटन सोहळ्याला,दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, महापौर उदय मडकईकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 कार्निव्हची सुरवात किंग मोमोचा चित्ररथाने करण्यात आली. किंग मोमो यांनी उपस्थित प्रेक्षकांना खा, प्या, मजा करा असा संदेश दिला. तसेच किंग मोमो यांनी उपस्थित लोकांना चॉकलेट दिल्या तसेच आनंदित राहून या उत्सवाचा आनंद लुटण्याचा संदेश दिला. जुन्या सचिवालयासमोर कार्निव्हल मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. यात कार्निव्हलमध्ये मिरवणुकीत सुमारे 27 चित्ररथ सहभागी झाले होते.

या कार्निव्हल मिरवणुकीत गोव्यातील अनेक संस्थांचे चित्ररथ होते. या चित्ररथामध्ये पर्यावरण संदेश तसेच आमचे पारंपरिक व्यवसाय गोव्याची संस्कृती संदेश देण्यात आला होता. तसेच जीसुडाचा कचऱयावर चित्ररथ होता. तसेच प्लास्टिक कचऱयावर चित्ररथ, ड्रग्जचे दुष्परिणाम यासंबंधी जागृती करणारे चित्ररथ लोकांना या कार्निव्हल मिरवणुकीत पाहायला मिळाले.

कार्निव्हल मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व जंक्शन आणि मिरवणुक मार्गावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे.कार्निव्हलचा आनंद लूटण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.यावर्षी पारंपरिक चित्ररथ मिरवणूकीत सहभागी झाल्याचे चित्र पहायला मिळत होते.पणजी मनपाने गोवा हे वेडिंग डेस्टिनेश ही संकल्पना घेऊन बनवलेला चित्ररथ सर्वांचे लक्ष वेधुन घेणारा होता.
  या कार्निव्हल मिरवणुकीत क्रीडा चित्ररथांना जास्त प्राधान्य दिले होते. राष्ट्रीय पातळीवर विजेता कबड्डी संघ, तसेच हॉकी, फुटबॉल यावर तसेच गोमंतकीय पारंपरिक खेळावर आधारित चित्ररथ कार्निव्हल मिरवणुकीत सादर करण्यात आले होते.
सर्वात पुढे असलेला किंग मोमोचा भव्य रथ सगळ्याच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता.याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महात्मा गांधी मिरवणुकीत फिरताना दिसले. यंदा दिवजा सर्कल ते कला अकादमी या पूर्वीच्या मार्गावरुन चित्ररथ मिरवणुक काढण्यात आली.त्यासाठी पोलिस खात्याने वाहतूक मार्गात बदल केले आहेत.कोणताही अनुचित प्रकार घडू नये ज्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.